काँग्रेस कार्यालयाचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा प्रयत्न कागद पत्रे गायब झाल्याचा आरोप..

■तोडफाड करणाऱ्यांना अटक न केल्यास काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा ...जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी घेतली कार्यकर्त्यांची भेट..


डोंबिवली ( शंकर जाधव ) रविवारी डोंबिवलीतील काँग्रेसचे जनसंपर्क कार्यलयाची अज्ञात इसमांनी तोडफाड केल्याची घटना घडली. य घटनेनंतर कार्यकर्ते  संतप्त झाले आहेत.कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सोमवारी डोंबिवलीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.


          त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोटे यांनी काँग्रेस कार्यालयाचे पुरावे नष्ट करण्यसाठी हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त केला.तर  पोलिसांनी या घटनेचे गंभीर लक्षात घेऊन तोडफोड करणाऱ्याना तात्काळ अटक करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला.

Post a Comment

0 Comments