१५०निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदानकल्याण , प्रतिनिधी : रक्त नाड्यांमध्ये वाहावेनाल्यांमध्ये नको’ या सद्गुरुंच्या पावन शिकवणूकीचा अंगिकार करत संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवनगोवंडी येथे रविवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १५० निरंकारी भक्तांनी उत्साहपूर्ण रक्तदान केले. मिशनच्या गोवंडीचेंबूर व मानखुर्द परिसरातील भक्तगणांनी या शिबिरामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला.


      नुकताच मागील आठवड्यात व्हर्च्युअल रुपात आयोजित केलेला ३-दिवसीय ७४वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न झाल्यानंतर लगेचच निरंकारी भक्तगण निष्काम भावाने मानवसेवा करण्याच्या आपल्या कार्यामध्ये पुनश्च सक्रीय झाले आहेत. निरंकारी भक्तांच्या मानवतेच्या प्रति निष्काम सेवांचा शुद्ध समर्पित भाव या शिबिरातून पुनश्च अधोरेखित झाला आहे. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्लेमुंबई यांनी या रक्तदान शिबिरात रक्त संकलनाचे कार्य पार पाडले.


       या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक मोहन गुंडू यांनी केले. याप्रसंगी मंडळाचे अनेक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते ज्यामध्ये सेक्टर संयोजक बाबुभाई पांचाळ आणि सेवादलाचे क्षेत्रीय संचालक ललीत दळवी यांचा समावेश आहे.  या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये नगरसेवक फहाद खान व अनिल पाटणकर यांच्या व्यतिरिक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायकेशाखा प्रमुख एकनाथ खराडे आणि महावीर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.विनोद यांचा समावेश होता. सर्व गणमान्य व्यक्तींनी संत निरंकारी मिशनच्या मानवतेच्या प्रति निष्काम सेवांचे कौतुक केले.       रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मुखीप्रबंधक व सेवादल अधिकारी यांनी सेवादल स्वयंसेवक व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने केले.

Post a Comment

0 Comments