मोफत आरोग्य शिबिरात सर्वसामान्यांच्या डोळ्यांच्या तक्रारी गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोनाच्या महामारीकाळात म्युकर मायकोसिस आजाराने अनेक रुग्णांची होरपळ झाली. काही रुग्ण यामधून सुखरुप बाहेर आले तर काही रुग्णांना आपले डोळे गमवावे लागले. या घटनेला काही महिने उलटले असले तरी आजही डोळ्यांच्या तक्रारी नागरिक मोठ्या प्रमाणात सांगत आहेत. 


           शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिरात डोळ्यांच्या तक्रारी असणारे रुग्ण मोठ्या संख्येने आल्याचे आयोजक गोरक्षनाथ (बाळा) म्हात्रे सांगत होते. शिवसेनाप्रमुख. स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना मदत कक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संयुक्त विद्यमाने गोपीनाथ चौक डोंबिवली येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.


             पश्चिमकडील हरिहरेश्वर सोसायटीच्या पटांगणात गोरखनाथ (बाळा) म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे, माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून आयोजित करण्यात आले होते.  सदर आरोग्य शिबिरात अनमोल म्हात्रे, संदीप सामंत, मनोज वैद्य, विजय भोईर, राजू सावंत, शुभांगी चोरगे यांनी विशेष मेहनत घेतली. शिबिरासाठी लागणारी वैद्यकीय व्यवस्था राम राऊत यांची होती.


            मोफत शिबिराचा फायदा सुमारे 2500 नागरिकांनी घेतला. यामध्ये सुमारे 1187 नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. शिबिरात डोळ्यांच्या तक्रारी असणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी दिसून आल्याची माहिती नेत्रतज्ञ डॉक्टरांनी दिली. शिबिरात किडनी स्टोन शस्त्रक्रिया, कॅन्सर, डोळे तपासणी, नाक-कान-घसा तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, इंजिओप्लास्टी, इंजिओग्राफी आदि तपासणी व शस्त्रक्रिया मोफत होत्या.


         यावेळी गोरखनाथ म्हात्रे म्हणाले की, मोफत शिबिराला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. डोळे तपासणी नंतर ताबडतोब चष्मा मिळाल्याने जेष्ठ नागरिकांचे समाधान झाले. ज्या गरीब रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा रुग्णांना कळवा, उल्हासनगर व मुंबई  येथील सरकारी रुग्णालयात मोफत उपचारासाठी सुविधा मिळत असल्याने नागरिकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहे. आमच्या प्रभागातील नागरिकांना ही संधी मिळाली त्यामुळे आम्हीही सर्वांचे आभारी आहोत असे मत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments