"अ" प्रभागातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई


कल्याण, प्रतिनिधी  :  "अ"प्रभागातील   वडवली परिसरातील  अनाधिकृत पणे सुरू असलेल्या आर् सीसी इमारतीच्या बांधकामावर मनपाने तोडक कारवाई करीत अनाधिकृत आर् सी सी बांधकाम जमीनदोस्त केले.      

    
                 केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अनाधिकृत बांधकाम रोखण्यासाठी अँक्शन प्लान तयार करीत अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्याची अमंलबजावणी प्रभावी पणे राबविण्याच्या सूचना केल्या असून सहाय्यक आयुक्त "अ" प्रभागक्षेत्र सुहास गुप्ते यांनी पदभार स्विकारल्यांच्या दोन दिवसात अनाधिकृत बांधकाम पडण्याची धडक कारवाई सुरू केली असुन मगंळवारी बल्याणी,उबंर्णी परिसरातील अनाधिकृत २२रूम ,अनाधिकृत ४० जोत्यावर तोडक कारवाई केली. बुधवारी वडवली अटाळी प्रभागातील गणेश नगर परिसरात अनाधिकृत सुरू असलेले दोन इमारतीच्या आर् सी सी बांधकामावर तोडक कारवाई चा बडगा उचलीत पाडकाम केले.    

                
               "अ" प्रभागक्षेत्राचे सह्यक आयुक्त  सुहास गुप्ते यांच्या पथकाने केलेल्या अनाधिकृत बांधकामावरील कारवाई मुळे    अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा या कारवाईने धाबे दणाणले आहे.                                "आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या तसेच विभागीय उप  आयुक्त (अ नि बां)  अनंत कदम निर्देशानुसार कारवाई चा बडगा सुरु राहणार असुन अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या वर एम् आर् टी पी अँक्टनुसार गुन्हे दाखल करीत कारवाई सुरू असणार असल्याचे अ प्रभागक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त  सुहास गुप्ते यांनीअसे सागंत , नागरिकांनी अनाधिकृत घरे घेऊ नयेत  असे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments