टपाल विभागाने केली दोन दिवसीय सुकन्या योजनेची सुरवात

■शिबिरात आधार कार्ड आणि खाते उघडण्यास चांगला प्रतिसाद..


कल्याण,प्रतिनिधी  : कल्याणच्या वायलेनगरमध्ये टपाल विभागाने दोन दिवसीय सुकन्या योजना सुरू केली आहे. टिळक चौकटपाल विभागाच्या मुख्य कार्यालयच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करणयात आले आहे. आधारकार्ड आणि खाते उघडण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला.


मंगळवारी स्थानिक माजी नगरसेवक सुनील वायले यांच्या सहकार्याने वरिष्ठ डाक अधीक्षक एस.व्ही.व्यवहारे  यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोस्टमास्टर प्रदीप मुंधेपीआरआय (प्र) शुभांगी गांगुर्डेएमई संदीप जाधवएसए मिलिंद गांगुर्डेनीलेश सोनवणेयोगेश चोरघे व आदेश गायकर तसेच पोस्ट विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  शिबिरात सुकन्या योजनेसह आधारकार्ड संबंधी समस्यांचे निराकरण करण्यात आले. 


याशिवाय विभागाकडून लोकांची नवीन खातीही उघडण्यात आली.  वरिष्ठ डाक अधीक्षक एस.व्ही.व्यवहारे यांच्या आदेशानुसार कल्याण शहराचे पोस्टमास्टर प्रदीप मुंढे यांनी शिबिरात मार्गदर्शन करून लोकांना सुकन्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

Post a Comment

0 Comments