ट्रेड इंडिया द्वारे 'हेल्‍थ, ब्‍युटी अॅण्‍ड वेलनेस एक्‍स्‍पो २०२२ 'चे आयोजन


मुंबई, २६ डिसेंबर २०२१ महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्‍यापासून ११ हून अधिक व्‍हर्च्‍युअल व्‍यापार प्रदर्शन यशस्‍वीरित्‍या आयोजित केल्‍यानंतर ट्रेडइंडिया हे भारतातील सर्वात मोठे बी२बी बाजारस्‍थळ आणखी एक भव्‍य ऑफरिंग 'हेल्‍थ, ब्‍युटी अॅण्‍ड वेलनेस एक्‍स्‍पो २०२२'सह परतले आहे. जगातील आघाडीचे व्‍हर्च्‍युअल इव्‍हेण्‍ट व्‍यासपीठ ट्रेडइंडिया एचबीअॅण्‍डडब्‍ल्‍यू उद्योगामधील अनेक व्‍यवसायांना व्हिज्‍युअली लक्षवेधक व्‍हर्च्‍युअल वातावरणामध्‍ये ऑनलाइन त्‍यांची उत्‍पादने दाखवण्‍याची सुविधा देते.


      या इव्‍हेण्‍टबाबत बोलताना ट्रेडइंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप छेत्री म्‍हणाले, ''महामारीदरम्‍यान व्‍यवसाय कार्यसंचालने सुरू ठेवण्‍यासाठी देशभरातील विविध उद्योगक्षेत्रांना व्‍हर्च्‍युअल बैठकीची सुविधा दिल्‍यानंतर आम्‍ही आणखी एक भव्‍य डिजिटल प्रदर्शन 'हेल्‍थ, ब्‍युटी अॅण्‍ड वेलनेस एक्‍स्‍पो २०२२'सह परतलो आहोत. 


 

        या इव्‍हेण्‍टसह आमचा भारतीय एचबीडब्‍ल्‍यूई विभागाच्‍या समकालीन गरजांची पूर्तता करण्‍यासोबत त्‍यांना त्‍यांच्‍या जागतिक स्‍पर्धकांशी संलग्‍न होण्‍यामध्‍ये मदत करण्‍याचा मनसुबा आहे. याचा अर्थ असा की, नवीन तंत्रज्ञान ट्रेण्‍ड्स व विकासाला चालना मिळेल, जो सध्‍या चर्चेचा विषय आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे कीहा इव्‍हेण्‍ट भारतीय एचबीअॅण्‍डडब्‍ल्‍यू व्‍यवसाय समुदायासाठी खूपच लाभदायी ठरेल.''


       एचबीअॅण्‍डडब्‍ल्‍यू एक्‍स्‍पो-२०२२ १९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२२ पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. पण भारतातील आरोग्‍य व सौंदर्य क्षेत्राने संपूर्ण क्षमता गाठणे अजूनही बाकी आहे. बहुतांश कंपन्‍यांना विकसित जगामध्‍ये असलेले आधुनिक तंत्रज्ञान व नवोन्‍मेष्‍कारांबाबत माहित नाही. म्‍हणून भारतीय एचबीअॅण्‍डडब्‍ल्‍यू क्षेत्रामध्‍ये समाविष्‍ट अनेक व्‍यवसायांना आंतरराष्‍ट्रीय सौंदर्य व आरोग्‍य क्षेत्रामध्‍ये अग्रस्‍थानी असलेले नवीन तंत्रज्ञान-संबंधित विकास व सुधारणांशी संलग्‍न करण्‍याकरिता ट्रेडइंडिया बहुप्रतिक्षित हेल्‍थ, ब्‍युटी अॅण्‍ड वेलनेस एक्‍स्‍पो २०२२ आयोजित करत आहे. 


     आज भारतातील एचबीअॅण्‍डडब्‍ल्‍यू क्षेत्रामध्‍ये अनेक वैविध्‍यपूर्ण विभागांचा समावेश आहे- जसे हेल्‍थ सप्‍लीमेण्‍ट्स, कॉस्‍मेटिक्‍स, आयुर्वेदिक स्किन अॅण्‍ड हेअर केअर उत्‍पादने, सलून अॅण्‍ड स्‍पा उपकरण, पर्सनल केअर उत्‍पादने इत्‍यादी. डिजिटल प्रदर्शनामुळे भारतीय व्यवसायांना जागतिक दर्जाची सौंदर्य व आरोग्य उत्पादने खरेदी करण्यास आणि भारतीय ग्राहकांना त्‍यांचा अनुभव देण्‍यास मदत होईल.


    

      एचबीअॅण्‍डडब्‍ल्‍यू २०२२ उद्योगासाठी संलग्‍न असलेल्‍या लोकांसाठी उत्तम व्‍यासपीठ असेल. ज्‍यामुळे त्‍यांना डिजिटली ग्‍लोबल अॅण्‍ड जेन्‍यूएन प्रॉस्‍पेक्‍ट्सशी कनेक्‍ट होत सहभाग घेता येईल, माहिती मिळवता येईल, संपर्क वाढवता येईल आणि त्‍यांच्‍या ब्रॅण्‍डची प्रतिमा निर्माण करता येईल. या व्‍हर्च्‍युअल व्‍यापार प्रदर्शनामध्‍ये प्रख्‍यात डिजिटल स्‍टॉल्‍स आणि लाइव्‍ह चॅट/कॉल वैशिष्‍ट्यांचा समावेश असेल, ज्‍यामुळे डिजिटल प्रॉडक्‍ट लाँच आणि ब्रॅण्‍ड प्रमोशन्‍सना चालना मिळेल.

Post a Comment

0 Comments