राष्ट्रीय चॉकबॉल पंच शिबीर संपन्न


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : भारतीय चॉकबॉल संघटनेच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्य चॉकबॉल असोसिएशन आणि एसएसटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील पंच शिबिर दिनांक २० ते 22 डिसेंबर दरम्यान आत्मा मलिक एज्युकेशन इन्स्टिट्यूटआटगाव येथे आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यामध्ये भारताच्या आसामगोवा,महाराष्ट्र गुजरातपश्चिम बंगाल,दिल्लीमध्य प्रदेश आदी राज्यातून पंचांनी हजेरी लावली. यामध्ये जुने जाणकार मध्य प्रदेशचे यदुराज शर्मा व पश्चिम बंगालचेहिमांशू दस्तगिर यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.


२० डिसेंबर रोजी सर्व पंचांची नोंद करण्यात आली त्यानंतर २१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उदघाटन करण्यात आले. आत्मा मलिक स्पोर्ट्स आणि एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे व्यवस्थापक रत्नपारखी तसेच महाराष्ट्र चॉकबॉल संघटनेचे सचिव सुरेश गांधी व सह सचिव राहुल अकुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


शिबिराची सर्व व्यवस्था आत्मा मलिक संकुलाचे क्रीडा शिक्षक मनोज जाधव तसेच रेखा जाधव यांनी केली.  उद्घाटन प्रसंगी रेखा जाधव यांनी सूत्रसंचालन केले तसेच निरोप समारंभ वेळी एसएसटी महाविद्यालयाचे प्राचार्य जे. सी. पुरस्वानी आणि आत्मा मालिकचे इवेंट मैनेजर विमल यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्या हस्ते आलेल्या सर्व पंचांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


 सांगता समारोह वेळी आलेल्या पंचांनी आपले मनोगत व्यक्त करत शिबीर खूप चांगल्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात तसेच सर्व व्यवस्था खूप चांगली झाली असे मत व्यक्त केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे व पंचांचेमार्गदर्शक यांचे आभार व्यक्त शिबिराचे संयोजक व राष्ट्रीय पंच संदीप नरवाडे यांनी केले व शिबिराची सांगता केली.

Post a Comment

0 Comments