रिसॉर्टमध्ये ३ लाखांची चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेशहून अटक रिसॉर्टचा कर्मचारीच निघाला चोर


कल्याण , कुणाल  म्हात्रे :  कल्याणच्या रिसॉर्टमध्ये ३ लाखांची चोरी करणाऱ्या चोरट्याला उत्तर प्रदेशहून अटक करण्यात कल्याणच्या महात्माफुले पोलिसांना यश आले असून रिसॉर्टचा कर्मचारीच चोर निघाला आहे.


 

कल्याण पश्चिमेतील पाम्स वॉटर रिसॉर्ट मध्ये कर्मचारी तीन लाख २० हजार रुपयांची चोरी करुन पसार झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. जुनेद अन्सारी असं या चोरटय़ाचे नाव असून तो चोरी करुन आपल्या मूळ गावी उत्तर प्रदेशात निघून गेला होता.कल्याणच्या  महात्मा फुले चौक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गोरखपूरला जाऊन जुनेदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेली सर्व रक्कम हस्तगत केली असून सध्या तो पोलिस कोठडीत असल्याची माहिती महात्मा फुले पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डी. एन. ढोले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments