कल्याण, प्रतिनिधी : उंबरमाळी व तानशेत या रेल्वे स्थानकांना माजी आमदार तथा भाजपा भटके विमुक्त आघाडी प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी 24 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता भेट दिली. या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या मंजुरीसाठी नरेंद्र पवार यांनी विशेष प्रयत्न केले होते, नाशिक दौऱ्यावर दरम्यान त्यांनी इथे भेट देऊन पाहणी केली आहे.
शहापूर तालुक्यातील कल्याण कसारा रेल्वे मार्गावरील गेली 80 वर्षे प्रलंबित असलेल्या या स्थानकांच्या मंजुरीच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे दिल्लीला जाऊन मी पाठपुरावा केला होता, अनेक नागरिकांची मागणी होती मात्र रेल्वे स्थानक नसल्याने मोठी गैरसोय होत होती.
हे स्थानक निर्माण झाल्याने अनेकांना प्रवास आणि व्यावसायिक कामासाठी सुविधा निर्माण झाल्या आहेत. सदर स्थानकांना भेट देऊन पाहणी केली, दरम्यान स्थानकावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना व्यक्त केले.
या रेल्वे स्थानकांच्या मंजुरीसाठी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी नरेंद्र पवार हे आमदार असताना त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या सगळ्या साठी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज्य कपिल पाटील यांचे मोलाचं सहकार्य लाभलं.
यावेळी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, स्टेशन मास्तर . कांबळे, . पासवान, जी.आर.पी..शिंदे, न्यू इंग्लिश स्कूलचे सुनिल घनघाव, रेल्वे कॉन्ट्रॅक्टर वैभव घनघाव, प्रितेश घनघाव, उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे लिपीक अमोल काळे, बिर्ला कॉलेजचे आदर्श घनघाव , भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
0 Comments