ट्रूकची तेलुगू टायटन्स सोबत भागीदारी सर्वोत्तम गेमिंग टीडब्ल्यूएस ब्रँड म्हणून स्थापित करण्याचे उद्दिष्ट


मुंबई, २१ डिसेंबर २०२१ : ट्रूक या भारतातील उत्तम दर्जाचे वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, आवाजातील व्यावसायिकांसाठी तसेच संगीत चाहत्यांसाठी इयरफोन्स आणि बीस्पोक ऑकोस्टिक उपकरणे बनवणाऱ्या सर्वाधिक विश्वासू ब्रँडने प्रो कबड्डी लीग टीम असलेल्या तेलुगू टायटन्ससोबत त्यांचे अधिकृत ऑडिओ भागीदार म्हणून भागीदारी केली आहे. अलीकडील सर्व ट्रूक ऑफरिंग्स गेमिंग टीडब्ल्यूएस क्षेत्रावर भर देत असल्यामुळे ही महत्त्वाची भागीदारी कंपनीच्या अद्ययावत ब्रँड स्थानाशी पूर्णपणे सुसंगत आहे.


            ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले की, “प्रो कबड्डी लीगच्या सर्वाधिक प्रॉमिसिंग टीम्सपैकी एकीचा अधिकृत ऑडिओ भागीदार म्हणून आम्हाला विश्वास आहे की, आम्ही देशातील प्रत्येक कबड्डीच्या चाहत्याचा उत्साह कायम ठेवू. एक गेमिंगवर आधारित टीडब्ल्यूएस कंपनी म्हणून आमच्यासाठी हे दिमाखदार पद्धतीने जोडले जाणे ब्रँडिंगच्या संदर्भात एका अचूक टायमिंगपेक्षा कमी नाही. या पुढील प्रवास आमच्यासाठी तसेच आमच्या स्वप्नाशी जोडले गेलेल्या प्रत्येकासाठी हा पुढील प्रवास खूप रोमहर्षक आणि आनंददायी ठरेल, याची खात्री आहे.”


          "आम्हाला विवो प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामासाठी तेलुगू टायटनच्या ऑफिशियल ऑडिओ पार्टनर म्हणून ट्रूकशी जोडले जाताना खूप आनंद होत आहे. ट्रूक हा नवीन युगाचा ब्रँड असून तो आमच्या टीमच्या ऊर्जेशी जुळणारा आहे. आम्ही ट्रूकसोबत चांगले संबंध आणि यशस्वी सीझन यांच्यासाठी खूप उत्सुक आहोत" असे मत तेलुगू टायटन्सचे मालक श्री. श्रीनी श्रीरामनेनी यांनी व्यक्त केले.


           ट्रूककडून विविध प्रकारच्या अद्ययावत खऱ्या अर्थाने वायरलेस स्टिरिओ, वायरलेस हेडफोन्स, इयरफोन्स आणि साऊंड अ‍ॅक्सेसरीज दिल्या जातात, ज्या वर्गातील सर्वोत्तम आणि परवडणाऱ्या दरातील अकॉस्टिक उपकरण साऊंड व्यावसायिकांना आणि संगीताच्या चाहत्यांना देण्यासाठी अभियंत्यांच्या आणि अकॉस्टिक व्यावसायिकांच्या तज्ञ टीमने तयार केलेल्या आहेत.

Post a Comment

0 Comments