कल्याण ग्रामीण मध्ये दारू माफियांचा हैदोस सुरूच

■द्वारलीमाणेरे गावात लाखो रुपयांचा नवसागर मिश्रित रसायन नष्ट ३ लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट...


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावात आता दारू माफियांनी हैदोस घातला आहे. मलंगगड भागानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने द्वारली, माणेरे गावाच्या शिवारात तब्बल तीन लाख नऊ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. गावठी दारूची मागणी लक्षात घेता सध्या गुन्हे शाखाहिललाईन पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.


नव वर्षाच्या स्वागताला सध्या दारूची मागणी हि वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मांगरूळ गावाच्या शिवारात आणि नेवाळी मधील चाळींमध्ये कारवाई केली होती. यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाने विठ्ठलवाडीहिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे.


गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हे अत्यंत जीवितासाठी घातक आहे. त्यामुळे अशी अश्या दारूच्या विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. मात्र असं असतानाही डोंगराळ भाग आणि झाडाझुडपात लाखो लिटर नवं सागर मिश्रित रसायन ठेवून दारू माफियांचे दारू निर्मितीचे कारभार हे सुरूच आहेत. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक एस.एन.घुले, दुय्यम निरीक्षक आर.आर. चोरट जवान प्रमोद यशवंतराव, आर. एम. राठोड, कुणाल तडवी आणि सदानंद जाधव यांच्या पथकांनी सध्या ग्रामीण भागात कारवाईचा धडाका हाती घेतला आहे.

Post a Comment

0 Comments