अॅग्रीवाइजचा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सोबत करार

■शेतकरी व कृषीसमुदायाला कृषी वित्तपुरवठा करण्‍यासाठी सह-कर्ज करार केला ~


मुंबई, ७ डिसेंबर २०२१ : अॅग्रीवाइज फिनसर्व्ह लिमिटेड या भारताच्या झपाट्याने विकसित होणा-या कृषी-केंद्रित एनबीएफसीने सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भारताच्या सर्वात जुन्या बँकेसोबत सह-कर्ज करार केला. कृषी-कर्ज वितरणासाठी कृषी हे प्रमुख विश्वसनीय क्षेत्र आहे. सह-कर्ज करार शेतकरी, कृषी व संलग्न समुदायाला सुलभपणे, पादर्शकपणे व गतीशीलपणे किफायतशीर दरांमध्ये अर्थसाह्य मिळण्याची खात्री घेईल. आरबीआयच्या सह-कर्जांसंदभातील निर्देशांनुसार मिश्रित व्याजदरामध्ये कर्ज देण्यात येईल.


     अॅग्रीवाइजचे मुख्य आर्थिक अधिकारी श्री. कल्पेश ओझा म्‍हणाले, "ग्रामीण भारताला स्थिर आर्थिक सोल्यूशन्स देण्याप्रती आमच्या प्रवासामधील सेंट्रल बँक ऑफ इंडियासोबतचा सहयोग आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. आम्ही वंचित ग्रामीण ग्राहक विभागांपर्यंत आमचा पोर्टफोलिओ विस्‍तारित करण्याप्रती, तसेच आमच्या विद्यमान ग्राहकांसाठी आमच्या ऑफरिंग्जमध्ये वाढ करण्याप्रती कटिबद्ध आहोत. आमची बँकांच्या कमी खर्चिक फंड्ससह आमची पोहोचण्याची क्षमता व ग्राहक माहितीला एकत्र करणा-या सहयोगांचा लाभ घेण्याची इच्छा आहे. तसेच आमचा प्रबळ तंत्रज्ञान आधार एकसंध, पारदर्शक व योग्य पद्धतीने आमची उत्पादने व सोल्यूशन्स देण्यासाठी अद्वितीय ग्राहक माहिती प्राप्त करण्यामध्ये आम्हाला मदत करत आहे."


      सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. राजीव पुरी म्‍हणाले, "आम्ही कृषी क्षेत्राला कर्ज देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, कारण प्राधान्य क्षेत्राला कर्ज देणे हे आमच्या शेतकरी समुदायाला सक्षम बनवण्याचे प्रमुख लक्ष्य आहे. या सहयोगासह आमचा ग्रामीण व कृषीविभागामधील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्‍न आहे. अॅग्रीवाइज आपले विशेषीकृत ज्ञान आणि कृषी व संलग्न विभागांसह व्‍यवहार करण्याच्या अनुभवासह आम्हाला अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्यामध्ये सक्षम करेल."

 

      अॅग्रीवाइजने आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत १,२५० कोटी रूपयांहून अधिक रक्‍कमेचे कर्ज वितरण केले आहे आणि त्‍यांचे कृषी व संलग्न विभागामध्ये ३००० हून अधिक ग्राहक आहेत. भारत सकारचा ग्रामीण सक्षमीकरणावरील फोकस आणि भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्या को-लेण्डिंग मॉडेलशी (सीएलएम) बांधील राहत कंपनीने कृषीसमुदायाला किफायतशीर कर्जे देण्याकरिता समर्पित सह-कर्ज व्‍यवसाय विभाग स्‍थापित केला आहे. भारतीय शेतक-यांच्या आर्थिक गरजा नवोन्‍मेष्‍कारी उत्पादने व डिजिटायझेशनच्या माध्‍यमातून पूर्ण करण्यासाठी त्‍यांना अॅग्रीप्रीन्‍युअर्समध्ये (कृषी उद्योजक) बदलणे कंपनीचे महत्त्वपूर्ण ध्येय आहे. परिणामत: आज कंपनी भारतीय शेतकरी व कृषीसमुदायासाठी सर्वात विश्वसनीय 'एक-थांबा' गंतव्य बनली आहे.

Post a Comment

0 Comments