शहाड रेल्वे स्थानकातील जनरेटर रूम आगीच्या घटनेत जळून खाक


कल्याण :  मध्य रेल्वेच्या शहाड रेल्वे स्थानकातील फाँल्ट फार्म क्रं २वर असणाऱ्या जनरेटर रूमला आग लागल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली सुदैवाने जिवीतहानी  झाली नाही.                                    

            शहाड रेल्वे स्थानकातील फाँल्ट फार्म क्रमांक दोन वरील  जनरेटर रूमला भीषण आग लागल्याने आगीचे धुराचे लोट निघाले आगीमध्ये जनरेटर रूम जळून खाक  झाली. घटनास्थळी उल्हासनगर ,   कल्याण डोंबिवली मनपाच्या अग्निशमन दलाने पोहचत आगीवर  नियंत्रण आणले.


            या आगीच्या घटनेत  कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून आग कोणत्या कारणाने लागली हे समजू शकले नाही. या आगीच्या घटनेने रेल्वे स्थानकातील अग्नी सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे चित्र दिसत आहे.

Post a Comment

0 Comments