शाहीर स्वप्निल व त्यांच्या साथींनी केले दोन दिवसात ७०० विद्यार्थ्यांचे प्रबोधन

■किशोरवयीन आनंद मेळाच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन...


कल्याण, प्रतिनिधी  : समाजात विविध विषयांवर काम करणाऱ्या अनेक संस्था ह्या जोमाने काम करत आहेत. वाचा ही संस्था किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. नुकतेच ४ ते ५ डिसेंबर रोजी किशोरवयीन आनंद मेळा कल्याण येथील कचोरे गावात पार पडला. मुलींच्या आरोग्य शिक्षण साठी काम करणारी वाचा संस्था दरवर्षी विविध उपक्रम राबवत असते.


 ह्या किशोरवयीन आंनद मेळा मध्ये लाकडी फळीला खिळे मारणे हा एक स्टॉल होता. घरात कुठे खिळा ठोकायचा असेल तर पुरुषाची गरज लागते पण तेच काम महिला ही करू शकतात हे दाखवून देण्यासाठी त्यांनी लाकडी फळीला खिळा मारण्यासाठी एक वेगळा स्टॉल ठेवला होता. सापसिडीच्या खेळात स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांबद्दल घरात विविध प्रोत्साहन देणारे लिखाण होते. अशा प्रकारे विविध स्टॉल ह्या शिबिरात लावले होते.  अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या शाहीर स्वप्निल शिरसाठ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या ठिकाणी दोन दिवस हजेरी लावली. तब्बल ७०० मुलांचं प्रबोधन सर्व साथींनी केले.


भूतभानामतीकरनी,चेटूकनाटूक यांसारख्या गोष्टींवर मुलांसोबत चर्चा केली. हातचलाखीहवेतून वस्तू काढणेलिंबू मिर्ची यांबद्दल समज गैरसमज वर चर्चा झाली. अंधश्रद्ध्येच्या बळी महिला वर्ग जास्त असतात आणि त्याच अनुषंगाने ह्या शिबिरात आलेल्या मुलींचे प्रबोधन व्हावे त्यांनी भविष्यात अंधश्रद्धेत गुरफटू नये त्यासाठी समूळ अंधश्रद्धा निर्मूलन झाले पाहिजे असेही वाचा संस्थेच्या कार्यकर्त्या रुपाली बारशिंग यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments