कवितांद्वारे दिला अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा

■भा.ज.पा. कला व सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती


कल्याण, प्रतिनिधी  : भा.ज.पा. कला व सांस्कृतिक सेलच्या पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती आणि पदाधिकाऱ्यांना व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवारी भा.ज.पा.कल्याण  जिल्हा कार्यालय येथे भा.ज.पा. कला व सांस्कृतिक सेलचे संयोजक सुधीर भगत यांनी केले होते. यावेळी कवितांद्वारे दिला अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देखील देण्यात आला.  


        यावेळी माजी 
आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे कोकण विभाग प्रमुख राहूल वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी, महिला प्रदेश चिटणीस प्रिया शर्मा, महिला जिल्हा सरचिटणीस आणि केंदीय चित्रपट प्रसारण सदस्य पुष्पा रत्नपारखीकोकण विभाग सह-संयोजिका अक्षया चितळे आदी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना आझादी का अमृत महोत्सव या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या कवितांचे वाचन ही करण्यात आले असल्याची माहिती संयोजक सुधीर भगत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments