अपघातग्रस्त वयोवृद्ध नागरिकाचे ट्रॅफिक वॉर्डनने वाचवले प्राण


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : अपघातग्रस्त वयोवृद्ध नागरिकाचे ट्रॅफिक वॉर्डनने प्राण वाचवल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे.


जयराज नायडू हे आपल्या दुचाकीवरून येत असताना शहाड नाक्याजवळ सेंच्युरी कंपनीसमोर अचानक स्पीड ब्रेकर वरून गाडी स्लीप झाली आणि १० ते १५  फूट घसरली गेल्यामुळे नायडू यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मार लागला. त्यातच त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. 


अपघाताच्या ठिकाणी अनेक नागरिकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच कल्याण वाहतूक विभागातील ट्रॅफिक वॉर्डनशुभम मिश्रा हे कर्तव्यावर होते. त्यांनी कशाचाही विचार न करता नायडू यांना ताबडतोब खांद्यावर घेऊन रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले व डॉक्टरांना उपचार करण्यासाठी विनंती करून अपघातग्रस्तांच्या मुलाला फोनवरून संपर्क साधून बोलावून घेतले.


यादरम्यान थोडा उशीर झाला असता तर नायडू यांच्या जीवाला धोका होता. परंतु ट्रॅफिक वॉर्डन शुभम यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे नायडू हे अति प्रसंगापासून वाले. याबद्दल शिवम मिश्रा यांचे नायडू परिवाराने खूप आभार मानले व कौतुक केले. 


 शुभम मिश्रा यांनी केलेल्या कामगिरीमुळे वाहतूक विभागाचे नाव झाले असून ट्रॅफिक वॉर्डन मधली माणुसकी दिसून आली. याबाबत वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक  तरडे आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त  धर्माधिकारी यांनी शुभम मिश्रा याचे अभिनंदन आणि कौतुक केले. 


Post a Comment

0 Comments