आम्ही वाहतूक नियमांचे पालन करू`...`नो चालान डे`निमित्त रिक्षाचालकांची शपथ


डोंबिवली ( शंकर जाधव ) शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला सर्वात जास्त जबाबदार वाहनचालक म्हणून रिक्षाचालकांना दोष दिला जातो.मात्र आपल्यावरील हा दोष दूर करण्यासाठी चक्क `आम्ही वाहतूक नियमांचे पालन करू`... `नो चालान डे`निमित्त रिक्षाचालकांची शपथ घेतली.याला मनसेच्या वाहतूक सेनेने साथ देत नागरिकांनीहि वाहतूकनियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी केले.तर वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांमध्ये जनजागृती आणि समुपदेशन केले.


         फेब्रेवारी महिन्यापासून लेखी चलान पद्धत बंद होऊन ई-चलान मशीन मध्ये दंड प्रणाली सुरु केली जाणार आहे.वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती होण्यासाठी व भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहनचालकांवर आकारला जाऊ नये म्हणून ३० डिसेंबर हा दिवस `नो चालान डे`आयोजित करण्यात आला होता.डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने वाहनचालकामध्येजनजागृती करण्यात आली.


     येथील रिक्षा थांबा येथील रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांच्या या कार्यक्रमात भाग घेत `आम्ही वाहतूक नियमांचे पालन करू`अशी रिक्षाचालकांची शपथ घेतली.तर मनसे वाहतूक सेनेचे कल्याण ग्रामीण व डोंबिवली वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अनिल वलेकर, चिटणीस अजय घोरपडे, उपचिटणीस संजय बाविस्कर,शरद गायकवाड,कल्याण आरटीओ प्रतिनिधी चव्हाण, चिटणीस अविनाश चिखले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

   


चौकट


   बाईक रायडर म्हणतो... हेल्मेट वापरा... अपघात टाळा..

    वाहतूक पोलिसांच्या या कामात  व्याप इंडिया ग्रुपचे बाईक रायडर रोहित अचारेकर हेही सहभागी झाले होते.ते म्हणाले, गेल्या मे ते नोव्हेंबर महिन्यापर्यत मी महाराष्ट्रभर स्कुटीवरून फिरून जनजागृती केली.दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे अत्यंत आवश्यक आहे.आपला जीव वाचवा म्हणून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे.

------------------------------------------------------------------

 

     वाढीव दंडाची माहिती आणि वाद टाळण्यासाठी जनजागृतीपर `नो चलान डे`..


   मोटर वाहन रेग्युलर २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटरवाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली आहे.लायसन्स न बाळगणाऱ्या वाहनचालकांवर वाढीव दंड व तीन महिने लायसन्स रद्द होईल.११ डिसेंबरपासून वाहतूक पोलीस कारवाई करत असताना वाढीव दंडाची माहिती वाहनचालकांना नसते.


    त्यामुळे वाहतूक पोलीस आणि वाहनचालक  यांच्यातील वाद टाळण्यासाठी आणि दंडाची माहिती मिळावी म्हणून`नो चलान डे`ला समुपदेशन करण्यात आले.सामान्य नागरिकांच्या सुरुक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकराने वाढीव दंडाची तरतूद केली आहे.कल्याण वाहतूक सहायक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील संकल्पने तून `नो चालान डे`ला गांधीगिरी मार्गाने जनजागृती करण्यात आली.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाविद्यालयिन विद्यार्थ्यांचे पथनाट्य

  

       तरुणवर्गाने वाहतुकीचे नियम पालन केल्यास शहातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.तरुणवर्गात जनजागृती होण्यासाठी डोंबिवली पूर्वेकडील प्रगती महाविद्यालयातील विद्यार्थ्यानि वाहतूक पोलिसांना मदत मिळावी म्हणून पथनाट्य सादर करण्यात आले. यात वाहतूक नियमाचे पालन करणे का आवश्यक आहे. ते कसे पाहिजे याची माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments