कर्जत कोर्टामध्ये ज्येष्ठ विधी तज्ञ आर. बी. पाटील यांच्या हस्ते केक कापून वकील दिन साजरा


कर्जत, प्रतिनिधी  : कर्जत कोर्टामध्ये ज्येष्ठ विधी तज्ञ आर. बी. पाटील यांच्या हस्ते केक कापून 3 डिसेंबर रोजी “वकील दिन” साजरा करण्यात आला. यावेळी कर्जत कोर्टातील सर्वच ज्येष्ठ कनिष्ठ वकील उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी एकमेकांना केक भरून आनंद साजरा केला. 


          स्वतंत्र भारतातील पहिले राष्ट्रपती व संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतातील पहिले वकील होते. म्हणून 3 डिसेंबर रोजी त्यांच्या जन्मदिनी भारतामध्ये “वकील दिन” साजरा केला जातो. या दिनाचे  अवचित कर्जत कोर्टातील वकिलांनी वकील कोर्टाच्या सभाग्रहात केक कापून हा दिन आजरा केला.


          विश्वामध्ये वकिलांना मोठा सन्मान दिला जातो. कोणताही देश असो तेथे कायद्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये वकिलांना मोठे महत्त्वाचे स्थान आहे. भारत देशाला १५  ऑगस्ट १९४७ आली जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा या देशाची राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी कोण यशस्वी पार पाडेल ? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांची चर्चा झाली आणि पुढे कायदेतज्ञ डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्य घटना लिहिली.


          कायदेतज्ञ म्हणून वकिलांना या देशामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा दिवस वकिलाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस समजला जातो. मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाबला फासावर लटकवण्याचे महत्त्वाचे काम सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी केले. अशी अनेक उदाहरणे  देता येतील. त्यामुळे कायद्याचे अभ्यासक म्हणून वकिलांकडे मोठया आशेने व आदराने पाहिले जाते. कर्जत कोर्टामध्ये सर्व वकिलांनी एकत्र येऊन “वकील दिन” साजरा केला. 


          यावेळी ॲड. आर बी पाटील, ए.पी. डिमेलो, ॲड. कैलास मोरे, ॲड. राजेंद्र निगुडकर, ॲड.अनिलकुमार पाटील, ॲड.दीपक पादीर, ॲड.निलेश पादीर, ॲड.दिपाली शिंदे, ॲड. अविनाश विशे, ॲड.वर्षा कोचुरे, ॲड. रुई येरुणकर, ॲड.केतकी हाडप, ॲड. हिनल ओसवाल, ॲड. अक्षय भोपतराव, ॲड. गीतेश सावंत, ॲड.हरिचंद्र हिंदोला, ॲड. प्रमोद देशमुख, ॲड.संकेत ठाकरे, ॲड. रवींद्र मुरबे, ॲड. भावना पवार, ॲड. प्रमिला चव्हाण आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments