ठाणकर पाडा प्रभागातील नागेश्वर मंदिर परिसरात लाद्या बसविण्याच्या कामाचा शुभारंभ नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा प्रभागातील नागेश्वर मंदिर परिसरात लाद्या बसविण्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. शिवसेना विभागप्रमुख आणि नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नाने हे काम सुरु झाले आहे.


      ठाणकर पाडा येथील नागेश्वर मंदिर परिसरात ड्रेनेज लाईन आणि गटाराचे काम पूर्ण करण्यात आले असून यामुळे येथील लाद्या खराब झाल्या होत्या. तसेच या लाद्या जुन्या देखील झाल्याने ये जा करतांना नागरिकांना त्रास होत होता. याबाबत नागरिकांनी शिवसेना शाखेत विभागप्रमुख आणि नगरसेवक मोहन उगले यांना याबाबत तक्रार केली. 


        उगले यांनी या तक्रारीची दखल घेत पालिकेकडे पाठपुरावा करत येथील लाद्यांचे काम मार्गी लावले आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांनी हे काम सुरु केल्याबद्दल नगरसेवक मोहन उगले यांचे आभार मानले आहेत.


      दरम्यान यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख मोहन उगले, जेष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, पिंटू दुबेराजेश साबळेतुषार मानकमेवैभव खडकबाणसाबळे मामाशिंदे आजीसुजाता धारगावकरसंदीप पगारेअनंता पगारबबन बिन्नरविकी मुकादम आदी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments