विधवा व निराधार महिलांना राष्ट्रवादीच्या वतीने आर्थिक सहाय्यता मिळवून देणार -- रुपाली चाकणकर
डोंबिवली ( शंकर जाधव ) विधवा  व निराधार महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आर्थिक सहाय्यता मिळवून दिले जाणार असे आश्वासन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी कल्याणात पक्षाच्या कार्यक्रमात दिले.आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरचंद्र पवार यांच्या १२ डिसेंबर वाढदिवसानिमित्त कल्याण येथील राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा व तालुका महिलांची विशेष बैठक पार पडली.          यावेळी त्या बोलत होत्या. कल्याण पश्चिम येथील रामदास वाडी याठिकाणी माळी समाजाच्या वतीने चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला. रामदास वाडी येथे अडीचशे महिलांचा चाकणकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या,बैठकीत कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पाशिंदे, ठाणे जिल्हा निरीक्षक माया कटारिया,ठाणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षा विद्या वेखंडे, महिला जिल्हा अध्यक्षा सारिका गायकवाड, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई,कार्याध्यक्ष उदय जाधव,भिवंडी शहराध्यक्ष स्वाती कांबळे,अंबरनाथ शहर अध्यक्ष पुनम शेलार,उल्हासनगर शहर अध्यक्षा रेखा हिराभिवंडी ग्रामीणच्या तालुका अध्यक्ष तथा शहापूरच्या तालुका अध्यक्ष आणि कल्याण-डोंबिवली जिल्ह्याच्या चारही विधानसभा अध्यक्ष मीनाक्षी आहेरउज्वला भोसलेसुनीता देशमुखतनुजा पाटणकर  सुरय्या पटेलउपाध्यक्षा रेखा सोनावणे,कार्याध्यक्ष संगीता मोरेउपाध्यक्षा वंदना गायकवाड,जिल्हा सल्लागार कुसुमताई गेडामउपाध्यक्ष अनिता ठक्करजिल्हा सरचिटणीस पूजा चौधरी,  जिल्हा उपाध्यक्ष छाया इंगळे,माया गुरवबिना निमकरगावकरमीना बनेसचिव स्मिता कोळेकरविनया पाटील,सपना धनगरसचिव राजश्री फुलपगार,रीना खोब्रागडे ,जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होत्या.        चाकणकर यांच्या हस्ते अंबरनाथ तालुक्याच्या नवीन अध्यक्ष सुनिता पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी तालुका अध्यक्ष काशिनाथ पाटील साहेब,अंकुश पाटीलतात्या पाटीलप्रल्हाद पाटील,अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय वंडार शेठ पाटील तसेच ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर पाटील यांनी युवकांची आढावा बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत युवकांनाही चाकणकर यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments