वेदमूर्ती डॉ. भीमराव कुलकर्णी यांचे निधन

 डोंबिवली ( शंकर जाधव ) चारही वेदांचा मराठीत शास्त्रीय अनुवाद करणारे डॉ. भीमराव सदाशिव कुलकर्णी यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात १ मुलगा , एक मुलगी, सून जावई व नातवंडे असा परिवार आहे.वयाच्या ९९ वर्षीही सक्रिय असलेल्या डॉ कुलकर्णी यांनी उपनिषदे, ऐत्तरिय, तैत्रेय ब्राह्मण उपनिषदांच्या अनुवादाचे  काम हाती घेतले होते.


        डॉ. कुलकर्णी यांनी मार्च महिन्यात करोनावर यशस्वीरित्या मात केली होती.मुंबईतील केईएम रुग्णालयात नोकरी करत असताना त्यांनी औषध निर्माण रसायन शास्त्रात डॉक्टरेट मिळवली होती. तेथेच त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचेही कार्य केले.निवृत्तीनंतर सलग ११ वर्षे मेहनत करून संपूर्ण वृग्वेदाचा टिप्पणीसह अनुवाद केला. त्यानंतर अथर्ववेद, सामवेद व यजुर्वेदाचाही अनुवाद केला.त्यांच्या या कार्यकरीता राज्यशासनाचा वेदविद्या विशारद पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 

Post a Comment

0 Comments