राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवण्यासाठी जनतेने संपूर्ण राष्ट्राने जागे होत सत्ता उखडून टाका – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस


डोंबिवली ( शंकर जाधव )  राज्य सरकारबरोबर सत्तेत असलेले काही जन स्वातंत्र्यवीर सावरकरावर लांच्छन लावत आहेत. हिंदुत्व वाचवू शकत नाहीत म्हणूनच हिंदुत्वाला वाचवायचे असेल, राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवायचा असेल तर जनतेने संपूर्ण राष्ट्राने जागे होत सत्ता  उखडून टाका असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आवाहन केले.


          ज्येष्ठ प्रवचनकार सावरकर व्याख्याते डॉ सच्चिदानंद शेवडे यांच्या डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात अध्यक्ष  म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपिठावर केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील, आमदार रविद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, शेवडे यांचे वडील सु. ग. शेवडे, पै लायब्ररीचे पुंडलिक पै आणि टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप घरत उपस्थित होते. 


           यावेळी शेवडे लिखित 'डावी विषवल्ली' या अनुवादित पुस्तकाचे आणि त्यांच्या एकसष्टी निमित्त त्यांच्यावर लिहिल्लेल्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच डॉ. योगेश जोशी यांनी संपादित केलेल्या धर्मसंस्कृतीचे विद्यापीठ  डॉ.सच्चिदानंद शेवडे गौरवग्रंथाचे प्रकाशनही  फडणवीस  आणि इतर मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.सदर गौरव ग्रंथाचे प्रकाशक अक्षरमंच प्रकाशन ( हेमंत नेहते ) व पै लायब्ररी ( पुंडलिक पै ) आहेत.

  
  
            यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, भीमा कोरेगाव, त्रिपुरा घटने नंतर नियोजन पद्धतीने घडवून आणलेले मोर्चे यांना लक्ष करत मोदी सरकार विरोधात विरोधकांना विकासाच्या मुद्द्यावर लढता येत नसल्यामुळे देशात अराजकता पसरवत उदार मतवादीचा आव आणला जात असल्याचा आरोप केला.  उदार घेतलेल्या मताच्या जीवावर राजकारण करणार्यांना संपविण्याचे आव्हान त्यांनी केले.सावरकराचा जाज्वल अभिमान असल्याचा आव आणत जे लोक सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होते. 


           त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले सावरकरावर लांच्छनास्पद आरोप करत असताना ते तोंडावर बोट ठेऊन बसल्याने त्यांना हिंदुत्वाचा दिखावा करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी  सांगितले. तर संसदेत निलंबित केलेल्या खासदारांनी माफी मागण्यास विरोध करताना आपण सावरकर नसल्याचे म्हटले होते.याचा दाखला देत तुम्ही सावरकर होऊ शकत नाही नव्हे तुम्हाला सावरकराचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. 

Post a Comment

0 Comments