महाराष्ट्र राज्य अँम्येच्युअर बॉडी बिल्डिंग असोसिएशन ची सभा संपन्न


कळवा, प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य अँम्येच्युअर बोडी बिल्डींग असोसिएशन ची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेचे अध्यक्ष के के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपोलो जिम् खारीगाव येथे संपन्न झाली सदर वार्षिक सभेला महाराष्ट्रातून मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी अहमदनगर भिवंडी नवी मुंबई तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व महाराष्ट्र कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित होते .           पुढील वर्षासाठी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन व तारीख ठरवण्यात आली महाराष्ट्राची स्पर्धा औरंगाबाद येथे घेण्याचे प्रस्ताव सभेमध्ये ठेवण्यात आला तसेच राष्ट्रीय स्पर्धा एप्रिल 2022 मध्ये बेंगलोर येथे संपन्न होणार आहे तसेच महाराष्ट्रातील 19 जिल्हे या सभेमध्ये ऑनलाईन सहभाग झाले होते             या सभेमध्ये संघटनेचे अध्यक्ष के के पाटील मार्गदर्शन करताना काही मुद्दे चर्चा करण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने बॉडी बिल्डिंग व बॉडी बिल्डर यांना पुढील काळात कोणत्या प्रकारचे सहकार्य मदत संघटनेकडून करता येईल यावर चर्चा करण्यात आली राज्यस्तरीय खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू यांचा सर्व खर्च त्यांना देण्यात येणारी रोख रक्कम मध्ये वाढ करण्यात आली आहे.


     
           तसेच खेळाडू व पदाधिकारी यांच्या सुविधा मध्ये सुद्धा वाढ करण्याबाबत चर्चा झाली महाराष्ट्राचे अध्यक्ष के के पाटील हे अखिल भारतीय अँम्येच्युअर बॉडी बिल्डिंग चे देखील अध्यक्ष असल्याने महाराष्ट्रातील पंच व पदाधिकारी यांना अखिल भारतीय स्पर्धेच्या ठिकाणी जास्त जास्त सुविधा देण्याबाबत सुद्धा चर्चा झाली


     
            महाराष्ट्र शासनाने दिलेले नियम व नियमावली यांचे पालन करून सदर स्पर्धा या संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा निर्णय ठरवण्यात आला काही नवीन जिल्हे संघटनेमध्ये येऊ इच्छित आहेत या जिल्ह्यांना भेट देऊन नवीन संघटनेच्या पदाधिकारीसोबत या खेळाचा प्रसार व प्रचार आणि युवकांचा फिटनेस संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्याचे व राज्य कार्यकारिणी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा फोरम आहे त्याच खर्चामध्ये नियोजन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.


   
          सदर सभा मध्ये अखिल भारतीय अँम्येच्युअर बॉडी बिल्डिंग चे  अध्यक्ष के के पाटील रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष सदानंद जोशी महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी गिरीश शेट्टी मुंबई अध्यक्ष प्रविण खामकर नंदकुमार तावडे अरुण कुरळे ठाणे संघटनेचे खजिनदार महादेव गोळे ठाणे संघटनेचे सचिव संदेश धर्माधिकारी कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील कार्यकारिणी सदस्य संतोष मलबारी औरंगाबादचे नोमान अहमद मोहसीन अहमद तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments