भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीच्या घटना नित्याच्या झाल्या असून वळ ग्रामपंचायत हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्स या गीदाम संकुलातील प्लास्टिक खेळणी बनविणाऱ्या करखान्या सह गोदामात पहाटे 4 वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे .
या आगीची माहिती मिळताच भिवंडी पाठोपाठ कल्याण- डोंबिवली, ठाणे महानगरपालिका यांच्या प्रत्येकी एक अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत स्थानिक पाण्याच्या टँकर च्या मदतीने आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला .परंतु पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील गोदामां मध्ये आग लागल्याने त्या ठिकाणी पाणी पोहचणे कठीण होत असल्याने आग विजविण्यात अडचण निर्माण होत होती .
दरम्यान आग पहाटे लागल्याने आगीचे कारण अजून स्पष्ट नसून कारखाना बंद असल्याने कामगार ही नसल्याने मोठी जीवितहानी टळली असून आग विझवण्यास तब्बल नऊ तास लागले असून आग आटोक्यात आली असून लाखो रुपयाची लहान मुलांची खेळणी, कार्टून जळून खाक झाली आहे.
तर शॉट सर्किट ने आग लागल्याची माहिती समजते तर आगीच्या दाहकतेने गोदाम इमारत कमकुवत होत दुसऱ्या मजल्यावर छत व काही ठिकाणी भिंत कोसळल्या आहेत. आग लागली तेव्हा प्रथम अग्निशमक दलाची उशीरा एकच गाडी आल्याने आग भडकल्याने मोठं नुकसान झाल्याचा आरोप वळ गावचे विजय बाबर यांनी केला आहे..
0 Comments