कल्याण, प्रतिनिधी : नविन अनधिकृत बांधकामे त्वरित तोडण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागातील सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी आज डोंबिवली पूर्व आयरे गाव येथील चार चाळींतील 20 रूमच्या बांधकामावर व 5 जोत्यांच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई केली. हि निष्कासनाची कारवाई बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता विनय रणशूर, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी तसेच महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 2 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.
महापालिकेच्या अ प्रभागातही विभागीय उपआयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अ प्रभागाचे सहा.आयुक्त सुहास गुप्ते यांनी बल्याणी, उंबर्ली या परिसरातील काम सुरु असलेल्या व रहिवास नसलेल्या 3 चाळीतील 22 अनधिकृत खोल्यांच्या बांधकामावर व एकुण 40 जोत्यांवर निष्कासनाची धडक कारवाई आज केली. हि निष्कासनाची कारवाई अधिक्षक स्वाती गरुड, अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी तसेच महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 2 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या 10/ई प्रभागातही विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ई प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व , माणगांव येथील 3 चाळीतील 18 रुमचे व 22 जोत्यांचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई आज केली. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी तसेच महापालिका पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.
0 Comments