कोरोनामुळे दगावलेल्याांच्या कुटुंबियांना 50 हजारांचे अर्थसाह्य द्यावे

राष्ट्रवादीच्याा नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी प्रभागाातील कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा..


ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगर पालिका क्षेत्रात जे ठाणेकर कोविडमुळे दगावले आहेत. त्या मृतांच्या नातेवाईकांना ठामपाने 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली. तसेच, ठाणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक विकासकामे रखडली आहेत. ही कामे प्राधान्यक्रमाने तत्काळ पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी तत्काळ निधी उपलब्ध करुन द्यावा, अशीही मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. 


          गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण आणि गटनेते नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ठामपा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी मा. विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, अपर्णा साळवी यांच्यासह सर्वच नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

 

           या भेटीनंतर शानू पठाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शानू पठाण यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारने कोविडमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची घोषणा केली आहे. त्याच धर्तीवर ठाणे पालिकेनेही ज्या ठाणेकरांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे.


          त्यांना अर्थसाह्य द्यावे; ठाणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये कोरोनामुळे सुमारे 2 हजार 108 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ठामपावर साधारणपणे 10 कोटी 54 लाखाांचा भुर्दंड पडणार आहे. मात्र, जर हे अर्थसाह्य एकरकमी देणे शक्य होत नसेल तर ते दोन टप्प्यांमध्ये द्यावे, अशी मागणी केल्याचे सांगितले.


          दरम्यान, कोविडमुळे ठाणे पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असली तरी अत्यंत महत्वाची कामे थांबवून चालणार नाही. सध्या नगरसेवकांना प्रभाग विकास निधी आणि नगरसेवक निधीवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र, हा निधी पुरेसा नाही. 


           त्यामुळे आयुक्तांनी प्राधान्यक्रम ठरवून त्या कामांची यादी तयार करावी आणि त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही केली असल्याचे शानू पठाण सांगितले. दरम्यान, या मागणीवर आयुक्तांनी सकारात्मकताा दर्शविली असल्याचेही पठाण यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments