भिवंडीत लग्न जमलेल्या सासरच्या मंडळींना खुश करण्यासाठी करीत होता चोऱ्या, घरफोड्या ; 5 कार ,5 बाईक ,सोन्याचे दागिने जप्त...


भिवंडी दि 10 (प्रतिनिधी ) पुढील महिन्यात बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेव बनणाऱ्या   अट्टल चोरट्याने आपल्या नव्या नात्यातील सासरच्या मंडळींना खुश करण्यसाठी घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात शांतीनगर पोलिसांना यश मिळाले असून त्याच्या ताब्यातून तब्बल 5 कार ,5 बाईक एक मंगळसूत्र असा 6 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.भिवंडी शहरातील टेमघर परिसरात राहणारा शिवासिंग अमिरसिंग बावरी वय 20 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


          तो अल्पवयीन असल्या पासून भुरट्या चोऱ्या करीत होता. त्याच्यावर या पूर्वी 4 गुन्हे दाखल असतानाच शांतीनगर पोलिसांना गुप्त बातमीदारा कडून या आरोपीची माहिती मिळाल्यावर पोलीस पथकाने त्यास सापळा रचून अटक करून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून भिवंडी, कल्याण, डोंबिवली, कळवा येथून चोरलेल्या 5 कार ,5 बाईक व एक चैन स्नाचिंग अशा तब्बल 11 गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे .

        पुढील महिन्यात लग्न असल्याने लग्नासाठी पैसे जमविणे व नव्या नातेसंबंधातील मंडळींना खुश करण्यासाठी त्याने घरफोडी चे गुन्हे केले असून कार चोरी करून तिचा उपयोग तो घरफोडी करण्यासाठी करीत होता अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे...

Post a Comment

0 Comments