"मलंगगड सर करणाऱ्या ओम"चे साहस आणि जिद्द कौतुकास्पद - माजी आमदार नरेंद्र पवार 4 वर्षाच्या ओम ढाकणे याचा सत्कार करून केले कौतुक


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण पश्चिम येथील 4 वर्षाचा मुलगा ओम ढाकणे याने नुकताच मंगलगड सर करत विक्रम केला आहे. सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहण संघाच्या मदतीने थरारक समजला जाणारा मलंगगड ओम ढाकणे याने व्यवस्थित पार केला. यामध्ये सुमारे 3 हजार 200 फूट उंच असलेल्या दोन कताळकड्या मधील पोलवर चालून मलंगगड अगदी सहज पार केला, सोबतच झिप्लायनिंग करून खालीही उतरला. त्याच्या या विक्रमी कामगिरी बद्दल माजी आमदार नरेंद्र पवार यांनी चिमुकल्याचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.


         इतक्या कमी वयात इच्छाशक्तीच्या जोरावर चिमुकल्याने विक्रम केला आहे. त्याने नवीन पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे. ओमचे साहस आणि जिद्द कौतुकास्पद असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान हैद्राबाद येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये किक बॉक्सिंग क्रीडा प्रकारात ब्राँझ मेडल मिळवून वर्ल्ड चॅम्पियनशिप रशिया २०२२ या स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झाल्याबद्दल नवीन अशोक पडवळ यांचाही नरेंद्र पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


        यावेळी यतिन ठाकूर, निखिल चव्हाण, समीर अंबुर्ले, मंगेश कनोजे, अजय जाधव, भूषण पवार, पवन घुगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments