राष्ट्रवादी हॉलीबॉल चषक 2021 अली बॉईज संघाने पटकावला


कळवा , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा मनिषा नगर सायबा ग्राउंड येथे दिनांक 4 व 5 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी हॉलीबॉल चषक 2021 स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये एकूण चोवीस संघांनी भाग घेतला होता महाराष्ट्राच्या बाहेरून बिहार दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश येथून सुद्धा खेळाडू खेळण्यासाठी आले होती .


         स्पर्धेच्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले की पारसिक नगर मध्ये दररोज हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलानी या टूर्नामेंट चे आयोजन केला आहे आणि विशेष म्हणजे दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश बिहार येथून खेळण्यासाठी टीम आलेले आहेत त्यामुळे खेळाबद्दल प्रेम किती आहे या पोरांमध्ये दिसून आले  आहे तसा मी क्रीडाप्रेमी आहे त्यामुळे हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी खोखो या स्पर्धा मला पाहायला आवडतात .          त्याप्रसंगी इतर मान्यवरांमध्ये माजी विरोधी नेता नगरसेवक मिलिंद पाटील नगरसेवक प्रकाश बर्डे माजी विरोधी नेत्या नगरसेविका प्रमिलाताई केणी कळवा प्रभाग समिती अध्यक्ष वर्षा मोरे नगरसेविका अपर्णा साळवी नगरसेवक गणेश कांबळे परिवहन सदस्य प्रकाश पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील वृक्ष प्राधिकरण सदस्य संगीता पालेकर ठाणे शहर युवती अध्यक्ष पल्लवी जगताप कळवा-मुंब्रा युवती अध्यक्ष पूजा शिंदे राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.


       स्पर्धेचे बक्षीस वितरण ठाणे महानगरपालिका माजी महापौर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मनोहर साळवी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी अली बॉईज संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम देण्यात आली या संपूर्ण स्पर्धेचे सहकारी पारसिक परिवार किशोर पार्क अर्जुन पाटील अजिता कुमठेकर विजय कुमार सोनी केतव भोसले आदर्श गव्हाणे श्लोक शिंदे प्रतिष सुर्वे आणि त्यांची संपूर्ण टीम होती.

Post a Comment

0 Comments