ईव्ही इंडिया एक्स्पो 2021 मध्ये जीटी फोर्स द्वारे ईव्ही दुचाकी प्रकारा मध्ये 3 उत्पादनांचा शुभारंभ

■ह्या ब्रँडने एक उच्च गतीची स्कूटरएक कमी गतीची स्कूटर आणि एका प्रोटोटाईप मोटर सायकलीचा शुभारंभ केला...


मुंबई, २७ डिसेंबर २०२१ : पर्यावरण अनुकूल पद्धतीने पुढे जाणारी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या जीटीफोर्सने जीटी ड्राईव्हजीटी‌ ड्राईव्ह प्रो आणि इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईप ह्या तीन इलेक्ट्रिक दुचाकींचे प्रस्तुतीकरण केलेह्या स्टार्ट अप ईव्ही उत्पादक कंपनीने आकर्षक शैली व उत्तम तंत्रज्ञानाचे उदाहरण दर्शवणा-या उच्च दर्जाच्या ईव्ही उत्पादनांच्या आकर्षक श्रेणीचे प्रस्तुतीकरण केले.

 


   जीटी ड्राईव्ह आधी जीटी‌ ड्राईव्ह आणलेल्या जीटी फोर्सने उच्च गतीचा प्रकार ब्रँडने त्या श्रेणीमध्ये नव्याने आणला आहेत्यामध्ये 60 किमी प्रति तास ही सर्वोच्च गती मिळते व एका चार्जवर 150 किमी इतके मोठे अंतर पार करता येतेहे उत्पादन हे लिथियमआयन बॅटरीमध्ये उपलब्ध आहेत्यासह तीन ड्राईव्ह मोडस मिळतातइकोनॉमीस्टँडर्ड आणि टर्बोस्कूटरमध्ये क्रूझ नियंत्रण प्रणालीसुद्धा उपलब्ध केलेली आहे.

 


     जीटी ड्राईव्ह प्रो- कमी गतीच्या प्रकारातील ही ईस्कूटर छोट्या अंतरावर प्रवासासाठी सेवा देण्यासाठी बनवण्यात आली आहेकुटुंबमहिला व मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ह्या उत्पादनामध्ये सर्वांसाठी सुविधा देण्यात आली आहेएका चार्जवर ती सहजपणे 75 किमी इतके अंतर पार करू शकते आणि 25 किमी प्रति तास ही‌ तिची सर्वोच्च गती आहेहे उत्पादन लीड एसिड आणि लिथिअम आयन बॅटरी वर्शन्स ह्या दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.

 


      जीटीफोर्सचे सहसंस्थापक आणि सीईओ श्रीमुकेश तनेजा ह्यांनी म्हंटलेलोकांचा असा गैरसमज असतो कीईव्हीज दूर अंतराच्या गरजांची पूर्तता करू शकत नाहीत किंवा त्या पुरेशा सुविधा देऊ शकत नहीतह्याचे कारण इतकेच आहे कीत्यांनी आजवर ह्या उत्पादनांचा अनुभव घेतलेला नाही आहेत्यामुळे ही उत्पादने देशाच्या कानाकोप-यात सगळीकडे उपलब्ध करण्यासाठी आम्ही कठोर मेहनत करत आहोतव्यापक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी आमची टीम नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.”

   


     ह्या उद्घाटनाविषयी बोलतानाजीटीफोर्सचे सह संस्थापक आणि सीओओ श्रीराजेश सैत्य ह्यांनी म्हंटले, “भारत हा ईसीईकडून हळु हळु ईव्ही कडे वाटचाल करत आहेग्राहकांसाठी गुणवत्तापूर्ण व अफॉर्डेबल अशी उत्पादने उपलब्ध करून आम्ही आमची भुमिका पार पाडत आहोतआमचे उद्दिष्ट व्यापक राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेची पूर्तता करणे हे आहे व ते करण्यासाठी सर्व ग्राहकांना ईव्ही तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अनिवार्य आहे      आम्ही आमच्या उत्पादन श्रेणीमध्ये टप्प्या टप्प्याने विस्तार करत आहोत व एक एक प्रकारच्या ग्राहकांच्या प्रवासातील आव्हानांना हाताळत आहोतआमची कमी गतीची वाहने सहजपणे मुलेमहिला व कुटुंबांच्या छोट्या अंतराच्या दररोजच्या प्रवासाच्या गरजांची पूर्तता करू शकतातएकदा ईव्हीज उपलब्ध झाले कीलोक त्यांची निवड करणे सुरू करतीलपरंतु तंत्रज्ञानाची ओळख झाल्यानंतर आणि ते कंफर्टेबल वाटल्यानंतरच ते ईसीईकडून ईव्ही हा बदल करण्याचा निर्णय योग्य माहितीसह घेऊ शकतील.”

 


     तसेचएक्स्पोमधील ऑडियन्ससाठी ब्रँडने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल प्रोटोटाईपचेही अनावरण केले आहे. 2022 वर्षाच्या दुस-या उत्तरार्धात ही मोटर बाईक बाजारपेठेमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 


      जीटीफोर्सने आधीच आपल्या वितरकांचे नेटवर्क देशामध्ये 80 शहरांमध्ये व 100 पेक्षा जास्त वितरकांसह वाढवले आहेसध्या तिची महाराष्ट्रकर्नाटकाहरयानापंजाबउत्तर प्रदेशउत्तराखंड आणि राजस्थानामध्ये विशेष उपस्थिती आहेसध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस किमान 150 पेक्षा जास्त वितरकांचे तिचे उद्दिष्ट आहेब्रँडची शेवटच्या उत्पादनासाठी सध्या बाजारात उत्पादने उपलब्ध आहेत.

   


ब्रँडविषयी

       जीटीफोर्स हा ह्युस्टन इनोव्हेशन्स एलएलपीचा मुख्य ब्रँड असून त्यांचे मुख्यालय हरयानात मनेसर येथे आहेह्या ब्रँडचा शाश्वत आणि आरामदायक खाजगी परिवहनावर नेहमीच विश्वास राहिलेला आहेशून्यापासून सुरुवात झाल्यानंतर कंपनीशी संबंधित लोकांनी बाजारपेठेमध्ये विश्वास संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेतजीटी फोर्स ह्या ब्रँड नावाने जीटी फोर्सने इलेक्ट्रिक स्कूटर्सचे अनेक मॉडेल सुरू केले आहेतजीटी फोर्सचे हे मॉडेल्स आकर्षक व विशेष सुविधा असलेले आहेत व त्यामधील तंत्रज्ञान पर्यावरणअनुकूल आहे.

Post a Comment

0 Comments