चिरंजीवी संघटनेतर्फे लहान मुलांनी घेतली फटाके न फोडण्याची शपथ
कल्याण , कुणाल म्हात्रे  : चिरंजीवी संघटनेतर्फे फटाकेमुक्तदिवाळी हा उपक्रम गेली ८ वर्ष वेगवेगळ्या विभागांमध्ये जाऊन शॉर्ट फिल्म आणि पथनाट्याच्या मार्फत जनजागृती करण्यात येते.


ह्या वर्षी देखील दिवाळीला विरार,  पालघरसायनमुंबईठाणेकल्याणमाणगावपुणेभोरविभागामध्ये उपक्रम घेण्यात आला. मंगळवारी शिवाजी पार्क येथे लहान मुलं तसेच पालकांनी मिळून आम्ही फटाके फोडणार नाही फोडू देणार नाही अशी शपथ घेतल्याचे प्रवकता पुष्कर धुरी यांनी सांगितले. तसेच हजारोंच्या संख्येने  महारष्ट्र भारत लहान लहान मुलांनी तसेच पालकांनी दिवाळी निम्मित फटाके फोडणार नाही अशी शपत घेतल्याची माहिती संघटनेच्या राज्य कार्यवाह ऐश्वर्या तोडकरी यांनी दिली.


         चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे.ही संघटना बालमजुरीबालभिकारी बालविवाह आणि लैंगिक शोषण अशा अनेक विषयांवर गेली आठ वर्षांपासून काम करत आहे. दिवाळीमध्ये फोडले जाणारे फटाके हे बाल मजुरांच्या श्रमातून तयार केले जातात.यामुळे बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो.


        बऱ्याचदा मुलांचे अपहरण करून अशा कारखान्यांमध्ये जबरदस्तीने कामाला लावले जाते व नंतर त्यांना शारीरिक हानी पोहचवून त्यांच्या कडून भिक मागवून घेतली जाते. कारखान्यात काम केल्याने ह्या लहान मुलांचे हात खराब होतात व आयुष्य बरबाद होते  आणि हे थांबले पाहिजे यासाठी चिरंजीवी संघटना लढा देत असल्याचे राज्याध्यक्ष नेहा भोसले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments