बंद पडलेल्या खदानीतील साचलेल्या पाण्यातूनच पाणीपुरवठा योजनेचा पर्याय


■दररोज ७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा२४ गावांची तहान भागणार...



डोंबिवली ( शंकर जाधव ) गावालगतच्या बंद पडलेल्या या खदानीतील साचलेल्या पाण्यातूनच पाणीपुरवठा योजना साकारण्याचा पर्याय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सुचविला आहे.भिवंडी तालुक्यातील कालवार गावालगतच्या खदानीतून दररोज तब्बल ७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे.त्यातून तब्बल २४ गावांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती दिली.येथील खदानीतून ७ दशलक्ष लिटर पाणी साकारल्यास भिवंडी तालुक्यातील ३४ पैकी २४ गावांसाठी वेगळी पाणीपुरवठा होऊ शकतो.



       कालवार येथील खदानीतील प्रचंड पाणीसाठ्याची माहिती घेऊन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हा परिषदेला पाहणी करण्याची सुचना केली होती.त्यानुसार कालवार येथील खदानीतून दररोज ७ दशलक्ष पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकेलअसा अंदाज पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एम.आडे यांनी व्यक्त केला.भिवंडी तालुक्यातील ३४ गावांना होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली होती.त्यात खदानीतील साचलेल्या पाण्याबाबतही चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कालवार येथील खदानींची पाहणी केली.


      यावेळी स्टेमचे महाव्यवस्थापक संकेत घरतजिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एम.आडे यांच्यासह विविध गावातील सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती.स्टेमकडून सध्या होणारा पाणीपुरवठा उर्वरित गावांमध्ये वळविता येणार आहे.पाणी शुद्धीकरण व पुरवठा करण्यासाठी स्टेम व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारावीअशी सुचना खासदार पाटील यांनी केली.त्याचबरोबर भिवंडी तालुक्यातील पाये गाव-ब्राह्रण पाडा येथील खदानीतील पाण्याचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भिवंडीतील ३४ गावांना जादा पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments