भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी काँग्रेसचे प्रभाकर पाटील बिनविरोध निवड
भिवंडी दि 3(प्रतिनिधी ) भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती वर शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस ,काँग्रेस या पक्षाच्या महाविकास आघाडी ची सत्ता असून विद्यमान सभापती संजय पाटील यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सभापती पदाची निवडणूक विशेष सभा सहाय्यक निबंधक शामकांत साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत सभापती पद करीता काँग्रेस चे प्रभाकर पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .


             या निवडी नंतर काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे , शिवसेनेचे पंडित पाटील विद्यमान सदस्य इरफान भुरे ,संजय पाटील ,विलास पाटील ,तन्वी पाटील सचिव यशवंत म्हात्रे यांसह कर्मचारी यांनी नवनिर्वाचित सभापती प्रभाकर पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत .

Post a Comment

0 Comments