शिवविष्णू दर्शन मित्र मंडळाने साकारली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती


शिवसेनेचे माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांच्या कडून कौतुक...


डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन महाविकास आघाडी सरकार करत असताना राज्यातील युवकांनी दिवाळी सणात किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे.डोंबिवली पश्चिमेकडील प्रभाग क्र.४८ गणेशनगर –बावनचाळ येथे शिवविष्णू दर्शन मित्र मंडळाने प्रतापगडाची किल्ल्याची प्रतिकृती बनवली.मंडळातील कार्यकर्त्यांनी १५ दिवस मेहनत घेऊन बनवलेल्या या किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमीखऱ्या किल्ल्यासारखे केलेले हुबेहूब बुरुजमाचीबालेकिल्लेधान्य व दारुगोळा कोठारगुप्त दरवाजाराजमहलविहिरी तलाव यांची माहिती या किल्ल्याकडे पाहून समजते. जनार्दन म्हात्रे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत कार्यकर्त्यांकडे ११ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.  


   स्थायी समितीचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे,युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकांनी प्रत्यक्ष किल्ल्याची प्रतिकृती पहिली.मंडळाचे हे  तिसरं वर्ष असून २०१९ साली तोरणा किल्ल्याची प्रतिकृती साकारली होती.यावर्षी आम्ही  प्रतापगडाची प्रतीकृती साकारली आहे. ४ फूट उंच,३० बाय   २० लांबी रुंदी २० किल्ला  बनवायला १५ दिवस लागले. असे मंडळाचे कार्यकर्ते ओमकार काळगावकर यांनी सांगितले.यावेळी माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे म्हणाले, शिवविष्णू दर्शन मित्र मंडळाचे कौतुक करतो कि त्यांनी किल्ल्यांची माहिती सर्वांना दिली. 


         पुढील पिढीसाठी हा आदर्शच ठरेल. तर युवा सेना कल्याण जिल्हा सचिव राहुल म्हात्रे म्हणाले, प्रभाग क्र.४८ गणेशनगर –बावनचाळ येथे स्थानिक माजी नगरसेविका रेखा म्हात्रे, माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे यांनी युवकांच्या या उपक्रमांचे कौतुक केले आहे. महाविकास आघाडी सरकार किल्ले संवर्धनासाठी व जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याप्रमाणे तरुणवर्गही किल्ल्यांसाठी पुढे येत असताना दिसतात.वरद गोंनकर,सिद्धेश अनभावाने,ओमकार काळगावकर,ओमकार भांबरे,कार्तिक गोरीवले,अक्षय सुपे,शुभम चौधरी,पियुष सुपे,चैतन्य मैस्त्री,विनीत गोरीवले.सिद्धेश कोयंडे, वेदांत कोल्हे,अथर्व सूर्यवंशी या मंडळातील कार्यकर्त्यांनी किल्ल्यांची प्रतिकृत बनविण्यासाठी अथक मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments