जनसेवक राजेश जाधव यांच्या आधारवड कार्यालयात रोटरी क्लबच्या माध्य मातून संपन्न झाले विना मूल्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर


ठाणे , प्रतिनिधी  : रविवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२१ रोजी रोटरी सर्व्हिस दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेस,रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पीरीअल,रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सीटी व ब्रह्मांड कट्टा मॉर्निंग वॉकर्स क्लब (BMC) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मांड मधे विनामूल्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. 


        हे शिबीर ब्रह्मांड कट्ट्यावर संस्थापक श्री.राजेश जाधव यांच्या ब्रह्मांड मधील "आधारवड " जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन रोटरी क्लबचे डी.जी. डॉ. मयुरेश वारके , ऐ.जी. अच्यूत बोसोकर  यांच्या हस्ते करण्यात आले. 


      या प्रसंगी तिन्ही रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुमेधा गणबावले, निहारिका देसाई, निलम केळकर,ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री.राजेश जाधव, बी.एम.सी क्लबच्या अध्यक्षा यशश्री आपटे व प्रवासी संघाचे कार्यवाह श्री.साळवी याच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तसेच ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री.राजेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. 


           या विनामूल्य आरोग्य शिबिरात ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, बी.एम.आय. तसेच डायबेटिस रेटिनापथी स्क्रीनिंग इ. चाचण्या करण्यात आल्या. तसेच काल डायबेटिस दिन असल्याने सगळ्यांना डायबेटिस बाबत माहिती देण्यात आली.


             रोटरी क्लब व ब्रह्मांड मॉर्निंग वॉकर्स क्लब यांनी आयोजित केलेल्या या शिबिराला ब्रह्मांड व आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.चार तासाच्या या शिबिरात जवळपास दोनशे जणांनी तपासणी करून घेतली. तसेच रक्तदान शिबिरात १५ जणांनी रक्तदान केले. हे रक्त थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांसाठीच वापरण्यात येणार आहे. 


             बालदिनाच्या दिवशी दिलेली ही अनोखी भेट होती.  रोटरी क्लबने लाॅकडाऊन नंतर आयोजित केलेले हे पहिलेच आरोग्य शिबीर होते. या कार्यक्रमात क्लबच्या अध्यक्षांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments