कल्याण तालुका परिसरात वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कँमेर्यात बिबट्या कैद

        



कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण ग्रामीण भागातील जांभूळपाडा नजीक वसगाव परिसरात बिबट्याने वासारांची शिकार केल्याची घटना घडल्याने रहिवाशांमध्ये "बिबट्या आला रे" या भितिने खळबळ उडाली होती.


 

कल्याण ग्रामीण परिसरातील वसगाव परिसरात बुधवारी बिबट्याने वासारावर हल्ला करीत शिकार केल्याची चर्चा असुन काही दिवसांपूर्वी बदलापुर जवळील जांभुळमोहेलीवसत  भागातील जगंल परिसरात बिबट्याचे ठसे आढळल्याचेही वुत्त होते. तसेच वन विभागाच्या कॅमेरात देखील याठिकाणी बिबट्या कैद झाला होता.


 बदलापूर ते बारावी धरण परिसर जंगलाचा भाग मोडतो. यामुळे कदाचित बिबट्या हा वसत परिसरात आला असावा. सद्यस्थितीत भात पिकाचा काढणीचा मोसम सुरू आहे. जगंलाच्या आजु बाजुच्या परिसर शेतीतील भात कापणीझोडणी कामे सुरू असुन शेतीचा भाग मोकळा झाल्याने लगतच जगंलाचा भाग असल्याने बिबट्याचा वावर असू शकतो अशी शक्यता होती.


 

बिबट्याने वासाराची शिकार केल्याच्या घटनेनंतर कल्याण वन परिक्षेत्र आधिकारी रघुनाथ चन्ने यांनी  तातडीने दखल घेत वसत येथील परिसरात ट्रॅप कँमरे लावले  होते. त्यांच्या अंदाजानुसार  रात्री शिकार झालेल्या ठिकाणी कोणता हि़ंस्त्र प्राणी कँमेराच्या माध्यमातून दिसतो का हे पाहिले जाणार होते.  वनपाल पथकांनी लावलेल्या ट्रप कँमेरामध्ये बिबट्या कैद झाल्याने बिबट्याच्या अस्तित्वाला दुजोरा मिळला आहे. 



यानिमित्ताने कल्याण वन विभागाच्या वतीने वसशेलवली, पठारपाडानालिंबी परिसरात जन जागृती करीत परिसरातील गावकऱ्यांनी एकट्याने जगंलात जाऊ नये,  फटाके वाजवावेत स्वतः ची व इतरांची काळजी घ्यावी रात्रीच्या वेळेस विजेरीचा वापर करावा. चाहूल झाल्यास थाळीनाद करावा  असे अवाहन कल्याण वनविभागाने केले असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र आधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments