शिवसह्याद्री प्रतिष्ठान सदस्यांनी केली रायगड स्वच्छता मोहीम फत्ते


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण पूर्वेत क्रिडासांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिव सह्याद्री प्रतिष्ठान मधील विविध वयोगटातील ३० सदस्यांनी किल्ले रायगड स्वच्छता मोहिमे फत्ते केली.  


शनिवारी सकाळी ६ वाजल्या पासून ऐतिहासिक, महाराष्ट्राचे प्ररेणा स्थान असलेल्या रायगडाची भ्रमंती सुरु करीत शिवसह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या  ३० सदस्यांनी गडावरील पडलेला कचरा संकलनास सुरुवात केली. यामध्ये होळीचा माळ बाजारपेठराजसदरजगदीश्वर मंदिर  आदी परिसरात जावून कचरा उचलण्याचे काम करण्यात आले. 


गडावरील पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बॉटलप्लास्टिक पिशव्या एकत्र करून कंचराकुडीत टाकण्यात आल्या. तसेच रायगड किल्याच्यी ऐतिहासिक वैभवाची माहितीशिवकालीन इतिहासाची माहिती गाईड घुरे यांनी शिवसाह्याद्री प्रतिष्ठान ३० सदस्यांना देत त्यांचे चैतन्य जागृत केले.    

                          

"पर्यावरण संवर्धन जनजागृती आणि स्वच्छता करण्याच्या कामासह गडांचे जतन व्हावेगड परिसरातील वनसंपदा कायम राहावीपर्यावरण संवर्धन व्हावे या दृष्टीने शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गढ किल्ले स्वच्छता मोहीमेचे दोन वर्षोपासून नियोजन केले जात आहे. 


पूर परिस्थितीत पूर ग्रस्तांना मदतीचा हात, कोरोना संकट कळात मदतशिवसाह्याद्री प्रतिष्ठान मार्फत कबड्डी संघातुन ४० कबड्डी खेळाडू सराव करून आजच्या मोबाईल अतिवापरापासून परावृत्त करीत मैदानी खेळात तरूणाईला आकर्षित करण्याचे काम देखील करीत असल्याचे संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांनी सांगितले."

Post a Comment

0 Comments