कल्याण - सावंतवाडी रेल्वे प्रवासी समितीच्या चिपळूण तालुका अध्यक्षपदी इकबाल चौघुले यांची निवड


कल्याण , प्रतिनिधी  : कल्याण - सावंतवाडी रेल्वे  प्रवासी समिती मुंबईच्या चिपळूण तालूका अध्यक्ष पदी पत्रकार इकबाल चौघुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण येथे नुकत्याच झालेल्या समीतीच्या आढावा बैठकीत ही निवड करण्यात आली आहे. कल्याण-सावंतवाडी रेल्वे प्रवासी समीतीचे संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकररत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संजय रेवणे यांचे हस्ते त्यांना पद नियुक्तीचे पत्र देण्यात आले.


कल्याण - सावंतवाडी रेल्वे प्रवाशी समीती ही रेल्वे प्रवासी असतील किंवा रेल्वे संदर्भात येणा-या अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत असते. मुंबई सह कोकणातील रेल्वे बाबतचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी या समितीकडून प्रयत्न केले जात आहेत. या साठी संघटनेचा विस्तार केला जात आहे.  ईकबाल चौघुले यांचा पत्रकारीता व सामाजिक श्रेत्रात कामाचा दांडगा अनुभव असून महाराष्ट्र राज्य आरोग्य हिवताप हंगामी कर्मचारी संघटनेचे राज्यअध्यक्ष म्हणून देखील ते चांगले काम करीत आहेत. समीतीच्या चिपळूण तालूका अध्यक्षपदाला ते नक्की न्याय देतील असा विश्वास सुनील उत्तेकर व संजय रेवणे यांनी व्यक्त  केला.  


या प्रसंगी उपस्थित साखर गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष उतेकरसामाजिक कार्यकर्ते विष्णू उतेकरमंगेश उतेकरदत्ताराम उतेकरविठ्ठल चव्हाणनाना उतेकरसुनिल चव्हाणशत्रघ्न मोरे आदी ग्रामस्थ यांनी इकबाल चौगुले यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments