इंदिरा गांधी यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत, व पंतप्रधान म्हणून केलेले कार्य यांचे महत्त्वाचे.. सभागृह नेते विकास निकम .
भिवंडी दि 19(प्रतिनिधी ) भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज महानगरपालिकेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या  वेळेला सभागृहनेते विकास निकम यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी  कारभारी खरात यांनी देखील  इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 


           यावेळी सभागृह नेते विकास निकम  यांनी सर्व उपस्थित यांना  राष्ट्रीय एकात्मतेची शपथ   दिली.  आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचा एक भाग म्हणून इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील व स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान म्हणून  योगदान यावर विकास निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. इंदिरा गांधी यांच्या घरातून स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली होती स्वातंत्र्याची चळवळ त्यांनी घरातून बघितल्यामुळे सगळ्या प्रकारची  आंदोलन, अनेक सत्याग्रह  जवळून बघितले, 1942 च्या चळवळीत देखील त्यांनी सहभाग घेतला.


              पंडित नेहरू यांच्या नंतर सर्वात जास्त प्रभावशाली पंतप्रधान म्हणून त्या ओळखल्या जातात. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्ध , बांगलादेशाची निर्मिती भारताचे   अणुऊर्जा धोरण, अवकाश तंत्रज्ञान, विज्ञान या क्षेत्रामध्ये भारताने जी प्रगती केली ती इंदिरा गांधी यांच्या काळात केलेली आहे. देशाकरता  इंदिरा गांधीनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ते देश कधीही विसरू शकणार नाही असेही विकास निकम यांनी नमूद केले.


              यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर कारभारी खरात, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड प्रभाग समिती दोनचे सहायक आयुक्त फैजल तातली, प्रभाग समिती क्रमांक 5 चे प्रभाग 5 चे  सहाय्यक आयुक्त गिरीश घोष्टेकर, बांधकाम कार्यालय अधीक्षक किशोर भदाणे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,  राष्ट्रीय नागरी उपजीविका केंद्र प्रमुख कैलास पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यालय अधीक्षक मनोहर लोकरे यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments