निळजे लोढा हेवन येथे कॉंग्रेसचे जनजागरण अभियानडोंबिवली ( शंकर जाधव )  वाढत्या पेट्रोल,डीझेलच्या किमतीगॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या  धोरणाचा निषेध व इंधनदरवाढ व महागाई विरोधात कल्याण डोंबिवली जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील निळजे स्टेशन जवळील लोढा हेवन येथील गावदेवी चौकातील काँग्रेस जिल्हा सरचिटणीस  शामराव यादव यांच्या कार्यालयाबाहेर जनजागरण अभियान राबविण्यात आले होते.


              महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या सूचनेनुसार  जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांच्या मार्गदर्शनाने काँग्रेसने जनजागरण अभियान राबविण्यात आली होती. ही सामान्य जनतेच्या मनातील व्यथा आहे, केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात अभियान राबविण्यात आल्याचे यावेळी जिल्हा सरचिटणीस यादव यांनी सांगितले. या अभियानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संतोष केणे,जिल्हा सरचिटणीस शामराव यादव, अजय पौळकरगणेश चौधरीएकनाथ म्हात्रेअजय भोईर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments