गॅस बाटल्याचा कंदील लावत गॅस चे वाढते दर कमी करण्याची मागणी

कल्याण, कुणाल  म्हात्रे  : दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक विषयांच्या अनुषंगाने विद्यार्थी भारती व मराठी भारतीचे कार्यकर्ते तरुण कलाकार सचिन सुतार,  राकेश सुतार आणि सुनीता सुतार ही भावंडं दिवाळीत कंदील बनवतात. यावर्षीही एक अनोखी आणि विचार करायला भाग पाडणारी युक्ती या कलाकारांना सुचली आहे.


       नुकतेच सरकारने एक घोषणा केली आहे,  पुन्हा एकदा घरगुती गॅस ची किंमत वाढणार असून  जे या पूर्वी 900 पर्यंत उपलब्ध होतं त्याचे दर 1100 किंवा 1200 पर्यत वाढणार आणि वाढले देखील. गरिबांच्या घरात पुन्हा चूल पेटवायची वेळ आलीये.सर्वसामान्य घरातील लोकांना पगारच 3000 असतो त्यांनी 1200 रुपयांचा बाटला भरला तर त्याचे कुटुंब त्याने कसे जगवावे. सामान्य जनतेला न पडवणारी ही किंमत जीव घेणी आहे असे मत सचिन सुतार यांनी मांडले.


        जनतेचा दबलेला आवाज  आणखीन दाबण्याचा हा  निव्वळ डाव आहे  सर्वसामान्य जनतेला अश्या प्रकारे छळण्याचा या सरकारला कोणताच अधिकार नाही . दिवाळीत दिवे पेटवन लांब राहिलं साधं गॅस पेटवन कठीण करणाऱ्या या सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ही किंमत कमी करावी किमान गोरगरिब जनतेला सुखाने खाता व जगता यावं  अशी विनंती मराठी भारतीचे राकेश सुतार यांनी केली आहे.


          गुदमरलेला  व कोंडलेला आवाज आणि सर्वसामान्य जनतेचाचे राग, चिड व्यक्त करणारे हाव भाव गरिबीची व्यथा सांगणारा बोलका सिलेंडर या प्रकारे कंदीलाची रचना केली असल्याची माहिती सुनीता सुतार यांनी दिली.

Post a Comment

0 Comments