भिवंडीत मॅरेज ग्राऊंड ला भीषण आग क्षणार्धात मंडप साहित्य, मोठ्या प्रमाणात दुचाकी जळून खाक

 


भिवंडी दि 29 (प्रतिनिधी ) शहरातील खंडू पाडा तय्यब  मस्जिद येथील अन्सारी मॅरेज ग्राऊंड येथे मोकळ्या जागेत साठविलेल्या मंडप  प्रॉपर्टी च्या ठिकाणी रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. 

     
            खंडू पाडा या गजबजलेल्या ठिकाणी हे मोकळ्या जागेत मॅरेज हॉल बनविण्यात आले असून तेथे एक लग्न सोहळा सुरू असताना या ठिकाणी लावलेल्या फटाक्याची ठिणग्या मंडप साहित्यावर उडाल्याने भीषण आग लागली व पाहता पाहता ती पसरल्याने लग्न सोहळ्यासाठी आलेल्या नागरीकांनी आपल्या दुचाकी पार्क करून ठेवलेल्या ठिकाणी आग पसरली,याच ठिकाणी मंडप साहित्य लाकडी बांबू ,कापड,सजावट फायबर साहित्य साठविलेले असल्याने ही आग लगेच भडकली व पाहता पाहता आगीने उग्र रूप धारण केले .


           आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरवात केली परंतु या ठिकाणी असलेला गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्याने आग भडकली व त्यामध्ये येथील साहित्य सह 12 हुन अधिक दुचाकी जळून खाक झाल्या आहेत .दरम्यान आगीवर एक तासात नियंत्रण मिळविण्यात आले .


           परंतु त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे .या आगीची वार्ता समजताच आसपासच्या नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती .परंतु कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची व घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी दिली आहे .गेल्या दोन दिवसात पाच आगीच्या घटना घडल्याने भिवंडीत खळबळ माजली आहे..

Post a Comment

0 Comments