भिवंडीत रमजान ईदीपासून शेकडो लिटर दुधाची चोरी करणारे चोरटे दिवाळीच्या मुहर्तावर सीसीटीव्हीत कैद ..
भिवंडी दि 3 (प्रतिनिधी ) खाद्य तेलांसह  दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती  दिवसेंदिवस गणनाला भिडणारी भाववाढ पाहता, सर्वसामान्य नागरिकांना घरगाडा चालवले महागाईच्या काळात मुश्किल झाले आहे. त्यातच चोरटयांनी आता महागड्या जीवनावश्यक वस्तूवर  डल्ला मारत असल्याच्या घटना समोर येत आहे. भिवंडी शहरातील एका  दूध विक्री केंद्रातून  रमजान ईदीपासून शेकडो लिटर दुधांची चोरी  करणारे चोरटे दिवाळीच्या मुहर्तावर  सीसीटीव्हीत कैद झाले आहे. 

 

         भिवंडी  शहरातील सौदागर मोहल्ला येथील चटोर गल्लीत नासिर दूध सेंटर  नावाचे दूध विक्री केंद्र आहे. या  केंद्रातून दुचाकीवरून आलेल्या एका चोराने  दुधाचे कॅरेट चोरी करत धूम ठोकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.  या चोरट्यासह आणखी काही चोरटा  दुधाची चोरी गेल्या रमजान महिन्यात करीत होते.  त्यामुळे दिवाळीच्या आदी दुकान मालकाने दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावले. आणि नेमके  चोरटे  चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद झाले. आता या प्रकरणी दुकान मालक आता  स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगण्यात आले. 


         विशेष म्हणजे रमजान महिन्यात दुधाची मागणी अधिक असते. तर दिवाळीतही मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केले जाते. त्यामुळे याच  संधीची फायदा घेत चोरटयांनी आपला मोर्चा दुधाकडे वळविल्याची चर्चा आता शहरात रंगली आहे. 

Post a Comment

0 Comments