१४ वर्षीय मुलावर २३ वर्षीय तरुणीचा लैंगीक अत्याचार तर पीडित मुलाच्या १६ वर्षीय बहिणीवर तरुणीच्या प्रियकराचा अत्याचार

■आरोपी प्रेयसीच्या सांगण्यावरून प्रियकराचा १६ वर्षीय मुलीवर अत्याचार दोघा आरोपींचे अत्याचार असाह्य झाल्याने प्रकार उघडकीस...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर २३ वर्षीय तरुणीने लैंगिक अत्याचार केला.  तर या तरुणीच्या प्रियकराने या पीडित अल्पवयीन मुलाच्या 16 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा लैगिक विकृतीचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेत उघडकीस आला आहे.


          या प्रकरणी विकृत तरुण व तरुणी विरोधात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद वळवी यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments