युरोपच्या आंतर राष्ट्रीय विश्व सुन्दरी स्पर्धेत ठाण्याच्या ऋजुता देशपांडे यांची उपविजेता किताब मिळवून उत्तुंग भरारी.


ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्याच्या ऋजुता देशपांडे यांनी युरोपच्या 'टॉप ऑफ द वर्ल्ड२०२१' या आंतरराष्ट्रीय विश्वसुन्दरी स्पर्धेत 'मिसेस वर्ल्ड सेकंड रनर अप २०२१' हा विजेता किताब व 'मिसेस लेडी टॉप ऑफ द वर्ल्ड २०२१' हा खास किताब मिळवून जगाच्या नकाशावर भारताचे व ठाणे शहराचे नाव उज्ज्वल केले.


         ऋजुता देशपांडे यांची टी.एस.ए पनाश या संस्थेतर्फे मिसेस एशिया म्हणुन निवड करण्यात आली होती. नुकत्याच युरोपमधील लॅट्विया या देशात ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या ' टॉप ऑफ द वर्ल्ड' या आंतरराष्ट्रीय विश्वसुन्दरी स्पर्धेत ऋजुता यांनी भारताचे व आशियाचे प्रतिनिधित्व केले. 


         नॅशनल कॉस्ट्यूम, स्विम सुट, इव्हनिंग गाऊन राउंड, टॅलेंट ज्युरी राउंड, नॅशनल प्रेझेंटेशन व प्रश्नोत्तर ज्युरी राउंड अशा विविध निकषांवर खरी उतरुन दमदार सादरीकरण करुन ऋजुताने 'मिसेस वर्ल्ड सेकंड रनर अप २०२१' हा विजेता बहुमान मिळवला. त्याबरोबरच 'मिसेस  लेडी टॉप ऑफ द वर्ल्ड' हा किताबदेखील पटकावला. टॅलेंट राउंड मध्ये ऋजुताने  सादर केलेला तराना हा शास्त्रीय गायन प्रकार खुप वाखाणला गेला. 


          ही स्पर्धा केवळ मनोरंजक नसुन भारतीय संस्कृतिचे प्रदर्शन घडविणारा सुंदर गानप्रकार सादर केल्याबदल ऋजुताचे ज्युरीकडून विशेष कौतुक झाले. नॅशनल प्रेझेंटेशन व प्रश्नोत्तर राउंडमध्ये ऋजुताने अतिशय आत्मविश्वासाने आपली मते मांडत ज्युरीवर प्रभाव पाडला व ब्युटी विथ ब्रेन अशी प्रतिक्रिया मिळवली.रशिया, लॅट्विया, बाल्टिक, अरुबा, युरेशिया, अर्मेनिया, यु.ए.ई. अशा विविध देशाच्या १३ स्पर्धक महिलांमध्ये ऋजुताने ही मजल मारली. या यशाबद्दल ठाणे महापौर माननीय श्री. नरेश म्हस्के व उपमहापौर माननीय सौ. पल्लवी कदम यांच्यातर्फे ऋजुता यांचा सत्कार करण्यात आला.

 

          ऋजुता स्वत: बायोलॉजी शिक्षिका तसेच गायिका व निवेदिका असून या सन्मानाचा यथायोग्य उपयोग एक भारतीय व स्त्री म्हणुन सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यासाठी करतील असे मनोगत त्यांनी व्यक्त केले व सर्व समर्थकांचे आभार मानले. या स्पर्धेसाठी ऋजुताला टी.एस्.ए. पनाश व तपस्या संगीत अकॅडमीच्या संचालिका सौ. वैष्णवी अग्निहोत्री यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments