ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी जन जागरण पदयात्रा

  


ठाणे  , प्रतिनिधी  :-  केंद्रातील बीजेपी सरकारच्या कृत्रिम महागाईने देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्थ झाली आणि त्या मुळे सर्व सामान्यांचे जीणे मुश्किल झाले आहे याचाच निषेध करण्यासाठी आज ठाण्यात काँग्रेस च्या वतीने जनजागरण पदयात्रा  मोर्चा काढण्यात आला.


          त्याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने निर्देशित केल्यानुसार व प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये  जनजागरण अभियान संपूर्ण ठाणे शहरात राबविण्यात आले. आणि या पंधरवडाभर चाललेल्या जनजागरण कार्यक्रमाचा समारोप ठाणे शहर काँग्रेस चे प्रभारी शरद आहेर आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.


         ठाणे काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयांतून पदयात्रा सुरू होऊन स्टेशन रोड मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यासमोर पदयात्रेची सांगता होणार होती परंतु बाजारपेठेतील सिद्धीविनायक मंदिर येथे मोर्चा अडविण्यात आला.


         यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे प्रभारी शरद आहेर,चंद्रकांत पाटील, ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे,सचिन शिंदे, राहुल पिंगळे,राजेश जाधव, भालचंद्र महाडिक,मिलिंद खराडे,धर्मवीर मेहरोल,शेखर पाटील,स्वप्नील कोळी,रवी कोळी,संदीप शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments