काकड पाडा येथील आदिवासी लोकांसोबत आविष्कार फौंडेशने केली दिवाळी साजरी गेल्या आठ वर्षापासून केला जातोय सातत्याने उपक्रम
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : आविष्कार एज्युकेअर फौंडेशन एनजीओ कल्याण आणि श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यठाणे जिल्हा यांच्या वतीने आदिवासी मुलांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. विनोद शेलकरसचिन जाधवगिरीश मंजुळेप्रणय काठे यांनी ऐक हात मदतीचाएक हात जाणीवांचा हा वसा आविष्कारच्या माध्यमातून घेतला आहे.


आदिवासी बांधवांची सर्वसाधारण लोकांसारखी त्यांचीही दिवाळी नवीन कपड्यांसोबत व्हावीयासाठी कल्याण पासून ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या काकडपाड्यातील कातकरी वाडी येथे वसुबारस दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जाऊन या आदिवासी २ ते ११ वर्ष वयोगटातील १०५ मुलेमुली यांना नवीन कपडे तसेच स्रियांना साड्यापुरषांना कपडेदेण्यात आले. 


अर्ध कपड्यांवर फिरणारी ती मुलेअनेक वर्षा पासून वापरत असलेले तेच ते जुने कपडे. परिस्थितीशीनिसर्गाशी सदैव दोन हात करत जगणाऱ्या त्या बापड्यांच्या चेहऱ्यावर कपडे घेतांना खूपच आनंद होता. असे आविष्कार फौंडेशनचे संस्थापक विनोद शेलकर यांनी सांगितले.


            माजी पंचायत समिती सभापती मोखाडा प्रदिप वाघसरपंच संजय वाघ व साऊथ इंडियन हायस्कूल चे शिक्षक योगेश खोरगडेदेविदास गवारी यांनी यावेळी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन पोलिस पाटील विठ्ठल गोडे व संजय वाघ यांनी केले. 


             प्रणय काटेसुभाष सरोदेअमोल पाटीलदेविदास गवारीयोगेश खोरगडेसंदीप पाटीलरोहित माळीमिलिंद दंभा  हे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच शैलेश कदमनेहा नितीन चौधरीदिपाली प्रणय काठे यांनी या बालगोपालांसाठी नवे कपडे खरेदी करून आविष्कार एज्युकेअर फौंडेशनला मोलाचे सहकार्य केले. 

Post a Comment

0 Comments