पोलीस आणि पत्रकारांना मिठाई वाटत व्यक्त केली कृतज्ञता


कल्याण शिवभिम  मिठाई, मावा, खवा, ट्रान्सपोर्ट, चालक, मालक, व्यापारी, कामगार संघटनेचा उपक्रम.


कल्याण , कुणाल म्हात्रे  : पोलीस आणि पत्रकारांना मिठाई वाटत कल्याण शिवभिम मिठाई, मावा, खवा, ट्रान्सपोर्ट, चालक, मालक, व्यापारी, कामगार संघटने कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र मध्ये होणारे प्रत्येक सण हे आपण सुखी समाधानी साजरे करतो ते महाराष्ट्र पोलीस यांच्या दक्षते मुळे परंतु पोलीस यांना कोणतेच सणसुद साजरा करता येत नाहीत ते कायम त्यांच्या कर्तव्यात हजर असतात तसेच त्यांच्या सोबत सणसुद असावे किंवा मोर्चे आंदोलन असो पत्रकार प्रतेक अचूक बातमी लोकांपर्यंत पोहचवतात वा अन्याय विरूध्द लढतात लोकांना न्याय मिळून देऊन देशातील ४ था आधार स्तंभ सांभाळणारे पत्रकार यांना मिठाई भेट देऊन संघटनेने दिवाळी शुभेच्छा दिल्या.            संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले चौक, कोळसेवाडी, कोंनगाव, भिवंडी, खडकपाडा, पोलीस स्टेशन वा वाहतूक शाखा, अप्पर पोलीस आयुक्त कार्यालय कल्याण, पोलीस उपायुक्त कार्यालय कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण कार्यालय, वाहतूक कार्यालय तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील पत्रकार यांची भेट घेत संघटनेस व व्यापारी यांना सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी संघटना संस्थापक अरविंद मोरे, सल्लागार प्रकाश मुथा, अध्यक्ष सागर पगारे, सचिव जयदीप सानप, उपाध्यक्ष लखपत सिंह राजपूत, खजिनदार राजा जाधव, सदस्य अनिल पवार रामेश्वर व इतर कार्यकर्ते सदस्य पदाधिकारी उपस्थित  होते.

Post a Comment

0 Comments