भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ सामाजिक संस्थांचा सत्कार

■महाराष्ट्रात पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या अंघोळीची गोळी संस्थेचा सत्कार.


कल्याण , प्रतिनिधी  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारबालगंधर्व रंगमंदीरपुणे येथे सामाजिक संस्थांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकरमहाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षीकोहीनूर ग्रुप चे प्रमुख कृष्णकुमार गोयल या मान्यवरांच्या शुभहस्ते हा सत्कार पार पडला. गांधीजींची प्रतिमागांधीजींचे पुस्तकमगशबनमवअसे या सत्काराचे स्वरूप होते. संवादपुणेकोहीनूर ग्रुप आणि युवक क्रांती दल या संस्था संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


यानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळीतील मुल्यांवर आधारीत सुरू असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. प्रेमबंधुभावत्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याचं कामांची दखल घेत संस्थेचा सत्कार करण्यात आला. झाडांना संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनरपोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी खिळेमुक्त झाडं ही मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली.


 अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडं ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था प्रेमबंधुभावत्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.


संस्थेचा सत्कार होणे नक्कीच आनंदायी आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे असे अविनाश पाटील यांनी सांगितले.


 आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्हीं प्रयत्न करत आहोत आणि यापुढें महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात आणि शहरांत खिळेमुक्त झाडं त्याचबरोबर बॅनरपोस्टरमुक्त झाडं आणि आळेयुक्त झाडं मोहीम विस्तारण्याचा आमचा मानस आहे असे यावेळीं राहुल धनवे यांनी सांगितले. संदीप रांगोळेधनंजय ठाकरेप्रणाली लाळगेविकेश बागलेवैभव जगदेव यांनी अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने हा सत्कार स्वीकारला.

Post a Comment

0 Comments