भिवंडीत अंगणवाडी सेविकांचा केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्र्यांच्या शुभ हस्ते गौरव


भिवंडी दि 21(प्रतिनिधी ) ठाणे जिल्हा परिषद महिलाव बाल कल्याण समिती सभापती श्रेया श्रीकांत गायकर यांच्या पुढाकाराने भाजपा भिवंडी तालुका कार्यकारिणीच्या सहकार्याने पडघा येथे नुकताच तालुक्यातील तब्बल 800 हुन अधिक अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर परिचारिका महिला पोलीस कर्मचारी यांच्या कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


          या कार्यक्रम प्रसंगी काही मोजक्या मान्यवरांचा सन्मान व्यसपीठावर झाल्या नंतर मंत्री कपिल पाटील यांनी सर्व अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यसाठी स्वतः व्यासपीठा खाली उतरून सर्वांमध्ये जाऊन त्यांची भेट घेत त्यांच्या कार्याचा गौरव केल्याने अनेक अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह अनेक महिलांना आवरता आला नाही.


           या प्रसंगी बोलताना कपिल पाटील यांनी या महिलांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्याने त्याचा आनंद हा सर्वोच्च असल्याचे सांगत कोरोना जगाला बराच काही शिकवून गेला असताना अंगणवाडी सेविकांनी आपल्या कुटुंबाची तमा न बाळगता समाजातील अनेक कुटुंबाची काळजी घेतली त्याचा सार्थ अभिमान समाजाला असल्याचे प्रतिपादन केले .

Post a Comment

0 Comments